Good news for HDFC Bank Customers | HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी, खाजगी क्षेत्रात HDFC बँकेने त्यांच्या ग्राहकांना (customers) पुन्हा एकदा आनंदाची बातमी दिली आहे.
बँकेने (Bank) मुदत ठेवीच्या (एफडी दर) दरात पुन्हा बदल केला आहे. नवे दर २० एप्रिलपासून लागू करण्यात आले आहेत. नवीन दर २ कोटी रुपयांपेक्षा कमी FD वर लागू होतील.
हे आहेत नवीन व्याजदर
बँकेच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांना ७ ते २९ दिवसांच्या एफडीवर २.५० टक्के व्याज दिले जात आहे. याशिवाय बँक ३० दिवस ते ९० दिवसांच्या एफडीवर (FD) ३% व्याज देत आहे. नवीन बदलानंतर, HDFC बँक ९१ दिवस ते ६ महिन्यांच्या मुदत ठेवींवर ३.५० व्याज देत आहे.
कमाल व्याज दर ५.६० टक्के
बँकेच्या वेबसाइटनुसार, एका दिवसापासून ते २ वर्षांच्या कालावधीत परिपक्व होणाऱ्या एफडीवर ५.१० टक्के दराने व्याज दिले जाईल.
१ दिवस ३ वर्षांच्या FD वर ५.२० टक्के व्याजदर आहे. त्याच वेळी, ३ वर्षे १ दिवस ते ५ वर्षांच्या FD वर ५.४५ टक्के व्याजदर आणि ५ वर्षे १ दिवस ते १० वर्षांच्या FD वर ५.६० टक्के व्याजदर मिळणार आहे.
FD व्याज दर २० एप्रिल २०२२ पासून प्रभावी (HDFC बँक नवीनतम FD व्याज दर २० एप्रिल २०२२ पासून प्रभावी)
- ७ ते १४ दिवस : २.५०%
- १५ ते २९ दिवस : २.५०%
- ३० ते ४५ दिवस : ३%
- ६१ ते ९० दिवस : ३%
- ९१ दिवस ते ६ महिने : ३.५%
- ६ महिने १ दिवस ते ९ महिने : ४.४%
- ९ महिने १ दिवस ते १ वर्ष : ४.४०%
- १ वर्ष १ दिवस ते २ वर्षे : ५.१०%
- २ वर्षे १ दिवस ते ३ वर्षे : ५.२०%
- ३ वर्षे १ दिवस ५ वर्षे : ५.४५%
- ५ वर्षे १ दिवस ते १० वर्षे : ५.६० %