मुंबई : राज्यात जवळपास सगळ्या मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. परंतु मशिदीत हे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का?, असा सवाल मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ट्वीटवर केलेल्या एका पोस्ट मधून केला आहे.
आक्रमक हिंदुत्वाची भूमिका मांडत त्यांनी मशिदींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत आग्रह केल्याचे दिसून येत आहे.
राज्यात जवळपास सगळ्या मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. परंतु मशिदीत हे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का? सर्वधर्मीय प्रार्थना स्थळात सीसीटीव्ही यंत्रणा का बसवू नये? असे केल्यास बऱ्याच चुकीच्या गोष्टींना चाप बसेल. तसेच असे करण्यास कोणाचाही आक्षेप असण्याचे कारणही नाही, असे बाळा नांदगावकर यांचे म्हणणे आहे.
त्यासोबतच राज्यसरकारने यासंदर्भात नियमावली बनवून त्याची कठोर अंमलबजावणी करावी असे निवेदनही त्यांच्याकडून देण्यात आले आहे. कट्टर हिंदुत्ववादाचं मनसेने उचललेलं हे दुसरं महत्वाचं पाऊल असल्याचं म्हटलं जात आहे.