Digvijay Singh : नेहरू-गांधी कुटुंबाशिवाय काँग्रेस पक्ष शून्य : दिग्विजय सिंह

Digvijay Singh

Digvijay Singh : काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरणार असलेले राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ‘नेहरू-गांधी’ परिवाराशिवाय काँग्रेस शून्य आहे, असे त्यांनी आज तकशी बोलताना म्हटले आहे.

गांधी घराणे आजही पक्षाच्या निवडणूक आणि इतर निर्णयांमध्ये हस्तक्षेप करते, असा प्रश्न दिग्विजय यांना विचारण्यात आला, तेव्हा त्या प्रश्नाचे उत्तर दिग्विजय (Digvijay Singh) यांनी दिले आहे.

दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी गुरुवारी उमेदवारी अर्जही खरेदी केला आहे. शुक्रवारी ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

त्याचवेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत शशी थरूर आणि दिग्विजय यांची नावे पुढे आली आहेत.

प्रत्येक सदस्याला निवडणूक लढविण्याचा अधिकार 

माध्यम प्रतिनिधींना बोलताना दिग्विजय म्हणाले की, पीसीसी प्रतिनिधींच्या प्रत्येक सदस्याला काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. पक्षाने सर्वांना पुढे येण्याची संधी दिली आहे. 30 तारखेची वाट पहा असे मी नेहमीच म्हणत आलो आहे.

गेहलोत हे गांधी विचारसरणीचे होते

अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी निवडणूक न लढवल्यामुळेच निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे का? त्यावर दिग्विजय म्हणाले की, गेहलोत हे आमचे अधिकृत उमेदवार असू शकतात, असे आतापर्यंत वाटत होते.

अशोक गेहलोत उभे राहिले तर आपण त्याच्याकडे आदराने पाहू. पक्षाच्या हितासाठी त्यांनी काम केले आहे. गांधींची विचारधारा जोपासली आहे.

त्यांनी पक्षासाठी निष्ठेने काम केले आहे. मात्र जयपूरमध्ये घडलेली घटना टाळता आली असती. त्यामुळे ही समस्या येत आहे.

निवडणूक लढवण्याचा माझा वैयक्तिक निर्णय 

अशोक गेहलोत यांच्या जागी मी अधिकृत उमेदवार नाही, असे दिग्विजय म्हणाले. निवडणुकीत उतरण्याचा माझा वैयक्तिक निर्णय आहे. मी माझ्या स्वतःच्या विवेकबुद्धीने उभा आहे. मला कोणीही उभे राहण्यास सांगितले नाही.

निवडणुका आणि इतर निर्णयांमध्ये गांधी कुटुंबाचा सहभाग असल्याच्या प्रश्नावर दिग्विजय सिंह म्हणाले की, गांधी-नेहरू कुटुंबाशिवाय काँग्रेस पक्ष शून्य आहे.