Digital Rape : ‘डिजिटल रेप’ म्हणजे नेमकं काय?, त्यात शिक्षेची तरतूद काय आहे?

3
Rape of a woman who went to see a rented house; Real estate agent arrested

Digital Rape : उत्तर प्रदेशात ८१ वर्षीय स्केच आर्टिस्ट, मॉरिस रायडर याला भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (बलात्कार), 323 (स्वेच्छेने दुखापत करणे), 506 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत एफआयआर दाखल केल्यानंतर अटक करण्यात आली होती.

या व्यक्तीवर गेल्या सात वर्षांत १७ वर्षाच्या मुलीवर डिजिटल बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. डिजिटल बलात्कार (रेप) म्हणजे काय? जाणून घ्या.

‘डिजिटल रेप’ हा डिजिटल पद्धतीने केलेल्या कोणत्याही लैंगिक गुन्ह्याशी संबंधित नाही, जसे की इंटरनेटवर किंवा कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्मचा गैरवापर करून एखाद्याची प्रतिमा खराब करणे.

तथापि, संमतीशिवाय दुसर्‍या व्यक्तीच्या खाजगी भागामध्ये बळजबरीने हाताची वा पायाची बोटे घालण्याच्या म्हणजे डिजिटल रेप. डिजिटल रेप प्रकरणात काय शिक्षा होऊ शकते याविषयी आता जाणून घेऊ या.

भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ नुसार, डिजिटल रेप प्रकरणात दोषी आढळलेल्या व्यक्तीला पाच वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये, शिक्षा १० वर्षे किंवा जन्मठेपेची शिक्षाही होऊ शकते.

डिजिटल रेपअंतर्गत घडलेले दोन गुन्हे

६० वर्षीय महिलेवर डिजिटल रेप

दिल्लीत एका ६० वर्षीय महिलेवर एका ऑटोरिक्षा चालकाने डिजिटल बलात्कार केल्याची घटना घडली होती. ६० वर्षीय महिला एका नातेवाईकाच्या घरी ऑटोमधून लग्न समारंभासाठी जात होती.

दरम्यान ऑटोचालकाने महिलेच्या खाजगी भागामध्ये लोखंडी रॉड घातला होता. या प्रकरणी ड्रायव्हरला अटक करण्यात आली. पण त्याला भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ अंतर्गत दोषी ठरवण्यात आले नाही.

दोन वर्षाच्या मुलीसोबत डिजिटल रेप

एका दोन वर्षीय मुलीला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर डॉक्टरांना तिच्या खाजगी भागामध्ये बोटांचे ठसे आढळून आले.

मात्र, तेव्हा लैंगिक छळ किंवा बलात्काराची कोणतीही चिन्हे आढळली नाहीत. तपासात असे निष्पन्न झाले की, तिचे वडीलच असे कृत्य करायचे.

त्यानंतर वडिलांविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. मात्र, बलात्काराशी संबंधित असलेल्या भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ अंतर्गत शिक्षा किंवा आरोप लावण्यात आला नाही.