मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नवे मुख्यमंत्री असतील आणि मी मंत्रिमंडळातून बाहेर राहणार असून त्यांना सर्वतोपरी मदत करेन, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सांगितले.
मात्र, आता या राजकीय घडामोडींमध्ये नाट्यमय वळण आले आहे. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असतील. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री व्हावेत, असे केंद्रातील भाजप नेतृत्वाचे म्हणणे होते.
देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये सहभागी व्हावे, असा निर्णय भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतला आहे, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (BJP national president J. P. Nadda) म्हणाले.
भाजपा ने महाराष्ट्र की जनता की भलाई के लिए बड़े मन का परिचय देते हुए एकनाथ शिंदे जी का समर्थन करने का निर्णय किया। श्री देवेन्द्र फडणवीस जी ने भी बड़े मन दिखाते हुए मंत्रिमंडल में शामिल होने का निर्णय किया है, जो महाराष्ट्र की जनता के प्रति उनके लगाव को दर्शाता है।
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) June 30, 2022
नड्डा म्हणाले, मी स्वतः देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याची विनंती करतो आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना तसे सांगितले आहे.
त्यानंतर भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांनीही याबाबत माहिती दिली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या म्हणण्यानुसार, देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या मनाने महाराष्ट्र आणि जनतेच्या हितासाठी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे, असे ट्विट अमित शहा यांनी केले आहे.
भाजपा अध्यक्ष श्री @JPNadda जी के कहने पर श्री @Dev_Fadnavis जी ने बड़ा मन दिखाते हुए महाराष्ट्र राज्य और जनता के हित में सरकार में शामिल होने का निर्णय लिया है।
यह निर्णय महाराष्ट्र के प्रति उनकी सच्ची निष्ठा व सेवाभाव का परिचायक है। इसके लिए मैं उन्होंने हृदय से बधाई देता हूँ।
— Amit Shah (@AmitShah) June 30, 2022
याबाबत अमित शहा यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. देवेंद्र फडणवीस यांनी नड्डा यांच्या विनंतीनंतर मनाचे औदार्य दाखवले आहे.
महाराष्ट्र राज्य आणि जनतेच्या हितासाठी त्यांनी या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्यांच्या महाराष्ट्राप्रती असलेल्या निष्ठा आणि सेवाभावी स्वभावाचा दाखला आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी ट्विट करून फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची विनंती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र यांच्याशी दोनदा फोनवरून संपर्क साधल्याचेही समोर आले आहे.
यानंतर फडणवीस यांनी अखेर मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.