उस्मानाबाद : शहरात व जिल्ह्यामध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेले सर्व स्वीमिंग पूल तात्काळ बंद करण्याची मागणी उस्मानाबाद शहरातील पालकांच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
उस्मानाबाद मध्ये एक एकाच आठवड्यात दोन मुलांचा बळी गेल्यानंतरही असे प्रकार सुरुच असल्यामुळे प्रशासनाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की, उस्मानाबाद शहर आणि जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी स्वीमिंग पूल सुरु करण्यात आलेले आहेत.
सध्या शाळा आणि महाविद्यालयांना उन्हाळी सुट्या असल्यामुळे लहान मुले, तरुण या स्वीमिंग पूलमध्ये मोठी फीस भरुन पोहायला शिकण्यासाठी तसेच अनेकजण पोहण्याचा अनेकजण पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी जात आहेत. परंतु आमच्या निदर्शनाला असे आले आहे की, या सगळ्या स्वीमिंग पूलच्या
देखभालीसाठी कुठेही प्रशिक्षित ट्रेनर उपलब्ध नाही. एखाद्या ठिकाणी ट्रेनर असला तरी तो मुले पोहत असताना जागेवर हजर नसतो.
पोहायला शिकण्याचे आमिष दाखवून पैसे लुटणार्या स्वीमिंग पूल चालकांच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे झाला आहे.
त्यामुळे पालक वर्गामध्ये प्रचंड भीती पसरली आहे. या दोन्ही प्रकरणांची सखोल चौकशी करुन दोषीवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.