Crime News | हॉटेलच्या खोलीत प्रेमीयुगुल मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ !

73
Crime News :

छत्रपती संभाजीनगर : शहरातील हॉटेल लॉजमध्ये एका प्रेमीयुगुलाचा मृतदेह आढळून आला आहे. पोलीस विभाग या प्रकरणाचा तपास करत आहे.

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील हॉटेल पंजाब येथील लॉजमध्ये एक जोडपे एकाच खोलीत राहत होते. दोघेही 29 जुलैपासून हॉटेलमध्ये थांबले होते.

दोघेही आज सकाळी हॉटेलच्या खोलीत बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी हलवले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

सागर राजेंद्र बावणे असे या मुलाचे नाव असून तो शहरातील सिडको परिसरात राहणारा आहे. सपना अंकुश खंदारे असे या तरुणीचे नाव असून ती शहरातील मुकुंदवाडी भागातील रहिवासी आहे.

या दोघांनी आपले जीवन का संपवले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पुढील तपास वेदांतनगर पोलीस करत आहेत.

हे दोघे मृतावस्थेत आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. दोघांनी आत्महत्या केली की अन्य काही कारणाने हे समजू शकलेले नाही.

हॉटेलच्या खोलीवर कोणतीही सुसाईड नोट किंवा इतर माहिती आढळली नाही. त्यामुळे त्या दृष्टीनेही पोलिस विभाग तपास करत आहे.

शवविच्छेदनानंतर दोघांच्याही मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकेल. मात्र, तोपर्यंत खोलीत सापडलेल्या इतर वस्तूंच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.