ब्राह्मण महासंघ Vs राष्ट्रवादी : अमोल मिटकरींच्या भाषणाविरोधात पुण्यात ब्राह्मण महासंघ आक्रमक; राष्ट्रवादी कार्यालयासमोर आंदोलन

Brahmin Federation vs NCP: Brahmin Federation aggressive in Pune against Amol Mitkari's speech; Movement in front of NCP office

पुणे : राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (NCP leader Amol Mitkari) यांच्या भाषणाविरोधात ब्राह्मण महासंघाने पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर आंदोलन केले. यावेळी महासंघाचे प्रमुख अनिल दवे यांच्यासह सहकाऱ्यांनी मिटकरी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही आक्रमक झाल्याचे दिसून आले. यावर अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली असता, मी कोणत्याही समाजाचा उल्लेख केला नाही, भाषणात अपशब्द वापरले नाहीत. षडयंत्र सुरू आहे, असे मिटकरी म्हणाले.

भाषणात नेमकं काय म्हणाले?

अमोल मिटकरी (NCP leader Amol Mitkari) यांनी सांगलीतील सभेत बोलताना पुरोहितांच्या नामजपाची खिल्ली उडवली होती. आम्ही बहुजनांच्या पोरांना समजत नाही, आम्ही लग्नाला गेलो होतो. नवरदेवाने पीएचडी केली आणि नवरीने तिकडे एमए केलेली.

यावेळी ब्राह्मणाने एक मंत्र उच्चारला म्हणजे मी वराच्या कानात म्हणालो, महाराज म्हणतात माझ्या बायकोला घेऊन जा. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री उपस्थित होते.

यामुळे राज्यभरातील पुरोहित संघटना संतप्त झाल्या असून आमदार अमोल मिटकरी यांच्यावर टीका करत आहेत. मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात ब्राह्मण महासभेतर्फे आंदोलन करण्यात येत आहे.

राज्यात राष्ट्रवादीची हीच भूमिका आहे का? असा सवाल परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी केला आहे.

यावेळी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेही उपस्थित होते. मात्र त्यांनी यावर आक्षेप घेतला नाही, हाच त्यांचा सामाजिक न्याय आहे का? असा सवाल देशपांडे यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

मिटकरी यांचा खुलासा 

मी एका गावातल्या कन्यादानाचे उदाहरण देऊन मंत्रोच्चाराचा उल्लेख केला. याचा कोणाला त्रास होण्याचे कारण नाही.

त्यामुळे भाषण वेगळ्या पद्धतीने वळविण्याचे षडयंत्र रचले जात आहे. तुम्ही माझे भाषण पूर्ण ऐकले असेल तर त्यात कोणत्याही समाजाचा उल्लेख नाही. मी कोणाबद्दल वाईट बोललो नाही.