लातूर : भाजी खरेदी करून स्कूटरवरून घरी परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दोन लॉकेट दुचाकीस्वारांनी चोरून नेले. 1 लाख 40 हजार रुपयांच्या चोरीप्रकरणी दोन अज्ञात दुचाकीस्वारांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर चोरी प्रकरणी अरुणा उत्तरेश्वर पवार (रा. विवेकानंदपुरम लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीत असे नमूद केले आहे की, त्या आपल्या मुलासह दयानंद गेट समोरील भाजी मंडईतून भाजी खरेदी करून स्कूटरवर घरी परतत होत्या.
दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे एक व एक तोळ्याचे एक असे 1 लाख 40 हजार रुपये किमतीचे दोन सोन्याचे लॉकेट चोरून नेले.
त्या स्कूटरवरून पडल्या आणि दोघेही दुचाकीवरून फरार झाले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.