शिंदे-शहा भेटीची मोठी अपडेट : गृहमंत्रीपदासाठी फडणवीसांचे नाही, तर ‘या’ नेत्याचे नाव आघाडीवर

Big update of Shinde-Shah meeting: Not Fadnavis for Home Minister, but 'Yaa' leader

नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दोघांनी शुक्रवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.

रात्री 9.30 वाजता सुरू झालेली बैठक मध्यरात्री 2 वाजता संपली. बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपावर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत नवीन गृहमंत्रिपद कोणाला मिळणार यावरही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गृहमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस नव्हे तर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आघाडीवर असल्याचे राजकीय सूत्रांकडून समजते. यापूर्वी फडणवीस मुख्यमंत्री असताना ते गृहमंत्री होते.

आता फडणवीसांऐवजी चंद्रकांत पाटील यांना हे खाते मिळण्याची शक्यता आहे. गृहखात्यासोबत सहकार आणि वित्त खात्यासाठी भाजपचा आग्रह आहे. चंद्रकांत पाटील हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत.

त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यास प्रदेशाध्यक्षपदी एखाद्या ओबीसी नेत्याची नियुक्ती होऊ शकते. आगामी महापालिका निवडणुकीवर डोळा ठेवून भाजप ओबीसींचा चेहेरा पुढे केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत कोणत्या पक्षाला कोणते आणि किती खाती मिळणार यावर शिक्कामोर्तब झाले. शिंदे गटाला 13 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे, तर उर्वरित भाजपला मिळण्याची शक्यता आहे.

शिंदे-फडणवीस आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला निश्चित झाला असला तरी सोमवारी सकाळी नव्या मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 40 आमदार आणि सुमारे 50 अपक्ष आमदारांसह बंड केले. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळा होऊन आठवडा झाला असला तरी अद्याप मंत्र्यांचा शपथविधी झालेला नाही. यासंदर्भात अमित शहा यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्याचे समोर आले आहे.