Rishabh Pant Health Update: टीम इंडियाचा यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या अपघातामुळे त्याच्या क्रिकेट कारकिर्दीची सतत चर्चा होत असते. ऋषभ टीम इंडियात कधी पुनरागमन करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मात्र ऋषभचे टीम इंडियात परत येण्यास उशीर होऊ शकतो. कारण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आता ऋषभच्या गुडघा आणि घोट्यावर शस्त्रक्रिया केली जाऊ शकते. त्यामुळे तो जवळपास 9 महिने क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे.
गुडघा आणि घोट्याच्या दुखापतीनंतर पंतवर दुहेरी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. बुधवारी पंतला बीसीसीआयने डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमधून मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये एअरलिफ्ट केले आहे.
आता पंतला शस्त्रक्रियेसाठी लंडनला नेले जाऊ शकते. मात्र, तो कधी जाणार याबाबत काहीही स्पष्ट झालेले नाही. पण शस्त्रक्रियेनंतर ऋषभ पंत जवळपास 9 महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे.
डॉक्टरांनी तो प्रवासासाठी योग्य असल्याचे समजल्यानंतर त्याला शस्त्रक्रियेसाठी लंडनला नेण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले. त्याला बरे होण्यासाठी किती वेळ लागेल हे अद्याप आम्हाला माहीत नाही.
सूज कमी झाल्यानंतर, डॉक्टर उपचारांचा कोर्स ठरवतील. पंतला गुडघा आणि घोट्याच्या दोन्ही शस्त्रक्रियांची गरज आहे. यासाठी त्याला जवळपास नऊ महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागणार आहे.
अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, सध्या आम्ही त्याच्या पुनरागमनावर लक्ष केंद्रित करत नाही तर त्याच्या पुनर्प्राप्तीवर लक्ष केंद्रित करत आहोत. त्याला बरे होऊ द्या. त्यानंतर तो संघात नक्कीच पुनरागमन करेल.