पुणे : महाविकास आघाडी सरकार आणि विरोधक यांच्यातील रोजच्या आरोप-प्रत्यारोपाने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.
या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद आता चव्हाट्यावर आला आहे. पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयात मारहाण केली. आंबेकर यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात पोस्ट टाकली होती.
त्याचा जाब विचारत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंबेकर यांना मारहाण केली. विनायक आंबेकर यांनी केलेल्या पोस्टविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
विनायक आंबेकर यांनी माफी मागितली
दरम्यान, या पोस्टनंतर विनायक आंबेकर यांनी माफी मागितली आहे. माझ्या कवितेच्या शेवटच्या दोन ओळी चुकीच्या होत्या.
नवनीत राणा आधी बारमध्ये कामं करायच्या : राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षांचं वादग्रस्त वक्तव्य
त्यामागे कोणताही वाईट हेतू नसला तरी त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असे माझे नेते गिरीश बापट यांनी मला कळवले असून ती पोस्ट मागे घेत आहे. ज्यांच्या भावना दुखावल्या आहेत त्यांची मी माफी मागतो. अशा शब्दांत आंबेकर यांनी माफी मागितली आहे.
केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात
दरम्यान, शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट टाकल्याने अभिनेत्री केतकी चितळेला चांगलेच महागात पडले आहे.
आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी केतकी चितळे हिला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून दिली आहे.
NCP कार्यकर्त्यांकडून शाई आणि अंडीफेक
या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केतकी चितळेवर हल्ला करण्यात आला आहे. तसेच शाईफेक अंडीही फेकण्यात आली. नवी मुंबई पोलीस केतकीला नेत असताना हा सर्व प्रकार घडला.
या वेळेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले दिसून आले. ‘केतकी चितळे हाय हाय’ अशा घोषणाही यावेळेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.