मुंबई : शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये युतीबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे, तसे संकेत दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून मिळत आहेत.
ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे मोठ्या बातम्या समोर येत आहेत. बाळासाहेबांची शिवसेना आणि पीपल्स रिपब्लिकन पक्ष यांच्यातील अधिकृत युती आज जाहीर होण्याची शक्यता आहे. यानिमित्ताने शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणार आहेत.
मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. दुपारी एक वाजता या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रा.जोगेंद्र कवाडे युतीची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. एकीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती झाल्याची चर्चा होत असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी आज युतीची घोषणा केल्यास ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे.
ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी आघाडीची चर्चा
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये युती सुरू आहे.
दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी याबाबत अनेकदा संकेत दिले आहेत. मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
दुसरीकडे, आज एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना आणि जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाची अधिकृत युती आज जाहीर होण्याची शक्यता आहे.