BGMI Ban in India | PUBG Mobile नंतर BGMI वर भारतात बंदी, जाणून घ्या कारण

BGMI Ban in India

BGMI Ban in India : Battlegrounds Mobile India (BGMI) वर भारतात बंदी घालण्यात आली आहे. हा मोबाईल शूटर Google Play Store आणि Apple App Store वरून गायब झाला आहे. वृत्तानुसार, हा गेम काढून टाकण्याचे आदेश भारत सरकारकडून आले आहेत.

दक्षिण कोरियन कंपनी क्राफ्टनने गेल्या वर्षी भारतात बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया (Battlegrounds Mobile India) किंवा BGMI लाँच केले. हा मोबाईल गेम कंपनीच्या लोकप्रिय शूटिंग गेम PUBG Mobile ची रीहॅश (Rehashed Version) केलेली आवृत्ती आहे, ज्याला “देशाच्या सुरक्षेला” धोका असल्याचे कारण देत इतर अनेक चीनी अॅप्ससह भारत सरकारने बंदी घातली होती.

क्राफ्टनने BGMI ला प्रदीर्घ काळानंतर भारत-विशेष गेम म्हणून लाँच केले. हे फीचर्स आणि गेम प्लेमध्ये PUBG मोबाइल सारखेच होते, परंतु काही किरकोळ बदलांसह सादर केले होते. मात्र आता सरकारच्या नव्या आदेशाने बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडियावरही देशात बंदी घालण्यात आली आहे.

BGMI वर भारतात बंदी का आली?

Play Store वरून BGMI काढून टाकल्याबद्दल, Google ने एका निवेदनात म्हटले आहे, “ऑर्डर मिळाल्यावर, स्थापित प्रक्रियेचे अनुसरण करून, आम्ही प्रभावित विकासकाला सूचित केले आहे आणि भारतातील Play Store वर उपलब्ध अॅपचा प्रवेश अवरोधित केला आहे.”

दरम्यान, क्राफ्टन म्हणाले, “Google Play वरून BGMI कसा काढला गेला हे आम्ही स्पष्ट करत आहोत आणि आमच्याकडे तपशील आल्यावर आम्ही तुम्हाला कळवू.”

बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया (BGMI) वर बंदी घालण्यामागचे कारण सरकारने अद्याप दिलेले नाही, परंतु ही कारवाई नुकत्याच उघड झालेल्या PUBG मोबाइलशी संबंधित कथित आत्महत्या आणि हत्येशी संबंधित असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

गेल्या महिन्यात आलेल्या एका वृत्तानुसार, गेमच्या वादातून एका 16 वर्षांच्या मुलाने आपल्या आईची गोळ्या झाडून हत्या केली होती. पोलीस घटनेचा तपास करत होते.

केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले होते की, 2020 मध्ये भारतात PUBG वर बंदी घालण्यात आली होती, परंतु बंदी घातलेले Apps पुन्हा नव्या अवतारात दिसत आहेत.

हा स्पष्टपणे BGMI चा संदर्भ होता, जो Crafton for India ने काही बदलांसह लॉन्च केला होता. आता भारत सरकारनेही क्राफ्टन या नव्या गेमवर देशात बंदी घातली आहे.