अकोला : सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या योजनांना लाभ न मिळालेल्या महिलांना सन २०२२-२३ वर्षात लाभ देण्यात येणार आहे. याबाबत महिला व बाल विकास समितीच्या सभेत चर्चा करून निर्णय घेण्यात आला.
महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवण्यात येतात. तसेच जिल्हा परिषदेच्या उपकरातून महिलांना वैयक्तिक लाभाच्या योजनेच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी साहित्याचे वितरण करण्यात येते.
शिलाई मशीनसाठी ३५ लाख, पिको मशीनसाठी ३० लाख, लेडीज सायकलसाठी २० लाखाची तरतूद करण्यात आली. मात्र यातील काही लाभार्थ्यांना लाभ मिळालेला नाही. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात या लाभार्थ्यांना लाभ देण्याची प्रक्रिया पार पडणार आहे.