Bawankule’s Big Statement | काँग्रेसचा आणखी एक माजी मुख्यमंत्री भाजपच्या संपर्कात? बावनकुळे यांचे मोठे वक्तव्य

Another former Congress Chief Minister in contact with BJP? Bawankule's big statement

Bawankule’s Big Statement | नाशिक : काँग्रेसच्या विरोधात बोलणे म्हणजे ते भाजपच्या संपर्कात आहेत असे नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल मोठे वक्तव्य केले असून भाजपचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत असे सूचक वक्तव्य केले आहे.

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच बावनकुळे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याबाबतही मोठे वक्तव्य केले आहे.

काँग्रेसमध्ये जिथे चुकते आहे, तिथे ते बोलत आहेत, त्यामुळे त्यांच्याशी गैरवर्तनही केले जात आहे. आता ते विधानसभेत चौथ्या रांगेत बसले होते. ते काँग्रेसच्या विरोधात बोलत असतील तर त्याचा अर्थ असा नाही की ते भाजपाच्या संपर्कात आहेत.

योग्य व्यक्तीला सन्मानाने सामावून घेऊ

भाजपचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत आणि जिथे गरज वाटेल तिथे योग्य व्यक्तीला सन्मानाने सामावून घेऊ, आणि पुढे जाऊ. तसेच बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, एकदा आरोप झाला आणि त्यानंतर कोर्टात शिक्षा झाली तर आम्ही त्यांना घेत नाही, असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.

Jio 5G Launch : तुमच्या फोनमध्ये Jio चा 5G सपोर्ट मिळेल का, पाहा सर्व कंपन्यांच्या मोबाईलची यादी

सत्तासंघर्षासाठी स्वतंत्र घटनापीठ तयार करण्यात आले आहे. न्यायमूर्ती एखाद्या कार्यक्रमाला येतात यात गैर काय? आम्ही काय आरोप करतो याचा विचार करावा, आपल्या आरोपांचा अर्थ न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही का? असा सवाल बावनकुळे यांनी जयंत पाटील यांना विचारला आहे.

बारामतीचे घड्याळ बंद पडणार

यावेळी बारामतीचे घड्याळ बंद पडणार असल्याचे मी बोललो यात काहीही चुकीचे नाही, मी बारामतीत कार्यरत आहे. मी 3 महिन्यातून एकदा जाईन. निर्मला सीतारामन देखील बारामतीत 6 महिन्याला एकदा दिसणार आहेत.

बारामती शहर म्हणजे लोकसभा मतदारसंघ नाही. शहराचा विकास केला म्हणजे मतदारांवर उपकार केले नाहीत, अशी टीकाही बावनकुळे यांनी केली.

मंत्रिमंडळ विस्तारावर मुख्यमंत्री निर्णय घेतील 

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारा कारण हा त्यांचा विषय आहे. कधी विस्तार करायचा आणि कोणाला कोणती खाती द्यायची हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर दिली.

उद्धव ठाकरेंनी त्यांच्या लोकांना आवरावे

ठाकरे गटाचे कार्यकर्ते राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवत आहेत. पोलीस त्याचा तपास करीत आहेत. मी उद्धव ठाकरेंना त्यांच्या लोकांना समजावून सांगण्याची विनंती करतो. रस्त्यावरील वाद टाळावेत, अशी माझी त्यांना विनंती असेल, असेही बावनकुळे म्हणाले.

मी पंकजा मुंडे यांच्याशी रोज बोलत आहे. त्या सध्या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहेत. पंकजा मुंडे भाजप पक्षावर नाराज नसून, इमानदारीने काम करत असल्याचेही बावनकुळे म्हणाले.

पटोले कोण आहेत?

नाना पटोले दिवास्वप्न पाहत आहेत. काँग्रेसमध्ये नाना पटोले यांची परिस्थिती फार दयनीय व केविलवाणी झाली आहे. बावनकुळे पुढे म्हणाले की, नितीन गडकरी साहेबांना ऑफर देणारे पटोले कोण आहेत? स्वतः गडकरी साहेबांनी जीव देईन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही; असे सांगितले आहे.

हे देखील वाचा