तुकडा बंदीचे नियम औरंगाबाद खंडपीठाकडून रद्द, आता 1-2 गुंठे जमिनीचा व्यवहार करता येणार

Aurangabad bench repeals piece ban rules, now 1-2 guntas of land can be traded

औरंगाबाद : आता एक बातमी तुमच्या कामाची आहे. जमीन खरेदी करणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. काही तुकड्यात तुम्हाला जमीन खरेदी करता येणार आहे. तीन गुंठ्यांची अट त्यामुळे असणार नाही.

कारण तुकडा बंदीचे नियम औरंगाबाद खंडपीठाकडून रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे खरेदीखत नोंदणीचे व्यवहार सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तुकडा बंदी नियमामुळे होणारा त्रास संपणार आहे. आता 1-2 गुंठे जमिनीचा व्यवहार करता येणार आहेत.

राज्यातील तुकडा बंदीचे नियम आणि परिपत्रक औरंगाबाद खंडपीठानं रद्द केलेत. त्यामुळे आता खरेदीखत नोंदणीचे व्यवहार सुरु होण्याच्या मार्ग मोकळा झालाय.

राज्य मुद्रांक विभागाने 12 जुलै 2021 पासून जमीन तुकडाबंदी नियम लागू केले होते. त्यात एन ए 44 जमीन वगळता इतर सर्व घरे, प्लॉट रजिस्ट्री बंद होती.

जमिनीचे तुकडे करुनही विकता येत नव्हते. त्याची रजिस्ट्री बंद होती. यासाठी महाराष्ट्र नोंदणी नियम क्रमांक 44 (1) (ई) हा नियम ठेवला होता.

त्यामुळं अशा घर आणि जमिनीची विक्री खरेदी व्यवहार नाईलाजानं बॉण्ड पेपरवर व्हायला लागली होती. या विरोधात काही लोकांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका केली होती, त्यावर औरंगाबाद खंडपीठानं हा निर्णय दिलाय. त्यामुळं आता तुकडा बंदीमुळे होणारा त्रास संपणार आहे.

जमिनीचा पट्टा 1 एकर असेल तर त्याचे तुकडे करुन त्यातील 1 ते 2 गुंठे जमीन विकता येत नव्हती, त्याचे रजिस्ट्री होत नव्हती. जमिनीचे ले आऊट केले तरच रजिस्ट्रेशनची मुभा होती, अथवा जिल्हाधिकारी परवानगीने रजिस्ट्रेशन होऊ शकत होते.