Aluminum Small Strip With Two Wheeler Key, What Is Number For? | दुचाकी घेतल्यावर चावी सोबत एक अल्युमिनियमची एक छोटीसी पट्टी येते, त्यावर 5 आकडी क्रमांक असतो, आपल्याला प्रश्न पडतो कि, कशासाठी असतो हा क्रमांक?
गाडीच्या चावीसोबत जी चीप असते, त्यावरचा नंबर हा त्या लॉकचा अनुक्रमांक असतो. गाडीची किल्ली बनवताना जे गाळे बनवतात त्यातील असलेल्या फरकांमुळेच एक किल्ली दुसर्या कुलुपाला लागत नाही.
गाड्यांसाठी लॉक आणि चावीची संख्या प्रचंड असते परंतु प्रत्येक सेट गाडीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वेगळा असावा लागतो , यासाठी काॅम्प्युटर प्रोग्राम असतात , आणी त्याला ओळखण्यासाठी अनुक्रमांक दिलेला असतो.
जर तुमची चावी हरवली किंवा तुटली तर या क्रमांकावरुन नवीन किल्ली बनवता येते म्हणुन ही चीप जपुन ठेवणे चांगले. यातला क्रमांक कितीही आकडी असु शकतो.
उदाहरणार्थ पाच आकडी क्रमांकाचे साधारण 80000 Combinations बनवतात, त्यानंतर हा क्रमांक परत येवु शकतो. सहा आकडी क्रमांकामधे ही शक्यता 800000 आठ लाखात एकदा परत त्याची पुनरावृत्ती होवु शकते.
सुरक्षिततेच्या दृष्टीने काही Combinations टाळली जातात, उदाहरणार्थ 100000 सारख्या नंबरचा प्रोग्राम, हे कुलुप एखाद्या तारेने सुध्दा सहज उघडले जावु शकते.
ही व्यवस्था दोन्ही म्हणजे फक्त किल्ली असलेल्या वहानांसाठी आणी Electronic Lock असलेल्या वाहनांसाठी थोड्याफार फरकाने सारखीच असते.
ग्राहकाच्या सोयीसाठी एका गाडीतील सर्व प्रकारच्या कुलपांसाठी एकच समान किल्ली ( Common Key ) दिली जाते, दुचाकी वहानात हा विषय मोठा नसतो परंतु त्यापुढच्या वाहनात सात आठ लाॅक आणि एकच समान किल्ली दिली जाते.
जसे स्टेअरिंग, इग्निशियन, बॅटरी, डिकी, स्टेपनी इत्यादी या सगळ्या लाॅकसाठी एकच समान किल्ली असते. आत्ताच्या काळात वहानाच्या सुरक्षिततेसाठी याच्या किल्लीबरोबर चिप न देता बारकोड दिला जातो.
कंपनीत गाडी जेंव्हा Offline होते तेंव्हा हा बारकोड स्कॅन करुन सिस्टिममधे सेव्ह केला जातो, तो बिलावर पण लिहीला जातो.
किल्ली हरवली तरी या क्रमांकावरुन परत त्याच गाडीची किल्ली सहजपणे बनवुन मिळु शकते. अनुक्रमांक माहित नसेल स्टिकर/चिप हरवली तरी चॅसिस नंबरवरुन त्या गाडीला कुठल्या अनुक्रमांकाची किल्ली लागेल हे पण सहज समजु शकते.
गाडीच्या इन्शुरन्स क्लेम, चोरी इत्यादी महत्वाच्या प्रसंगी हे रेकाॅर्ड कंपनीकडुन मागवता येते. ही अनुक्रमांक असलेली चिप संभाळुन ठेवणे ग्राहकाच्या हिताचेच असते.