Sanjay Raut PC: शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी जामीन मिळाल्यानंतर आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांची भेट घेतली.
यावेळी उद्धव ठाकरेंनी केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपवर निशाणा साधला. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधत शिवसेना एक आहे, त्यात दुफळी नाही, असे स्पष्टपणे सांगितले.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, संजय राऊत हे माझे चिरंजीव मित्र आहेत. ते शिवसेनेसाठी लढले आणि लढत आहेत. आता त्याला जामीन मिळाला आहे. न्याय देवतेने आम्हाला न्याय दिला. विरोधक आताही शांत बसणार नाहीत.
संजय राऊत यांना खोट्या प्रकरणात पुन्हा अटक होऊ शकते, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मातोश्रीवर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यात त्यांनी हे आरोप केले आहेत.