यवतमाळ : प्राध्यापक पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर धारदार चाकूने वार करून निर्घृण हत्या

Kopargaon police caught a tempo that was taking animals to slaughter

यवतमाळ, 16 मार्च : चारित्र्यावर संशय घेऊन व्यसनी प्राध्यापकाने पत्नीच्या गुप्तांगावर धारदार चाकूने वार करून तिची हत्या केली. आर्णी शहरातील स्वामी समर्थनगर येथे रविवारी दुपारी ही घटना घडली.

मारोती विठ्ठल आरके (वय ३५) असे आरोपी प्राध्यापकाचे नाव आहे. विमल मारोती आरके (३०) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी विमलची आई जयवंतीबाई माधवराव मसराम (रा. कुऱ्हा) यांनी आर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्णी येथील स्वामी समर्थनगर येथे राहणारे मारोती आरके हे अत्यंत गरिबीत होते. दरम्यान, काही वर्षांपूर्वी मारोती यांना लोणी येथील राष्ट्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली.

दरम्यान, कुऱ्हा येथील विमलशी त्याचे लग्न झाले. त्याचं आयुष्य छान चाललं होतं. त्यांना समर्थ (वय 8) आणि दत्त (वय 4) ही दोन मुलेही होती. दरम्यान मारोतीला दारूचे व्यसन लागले. यातून त्याला पत्नी विमलच्या चारित्र्यावर संशय येऊ लागला. यावरून त्यांच्यात सतत भांडणे होत होती.

कॉलेजला गेल्यावर आपली बायको दुसऱ्या कुणासोबत फिरते की काय अशी शंका डोक्यात घर करू लागली. या कारणावरून रविवारी (दि. 13) दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास त्याचा पत्नीशी वाद झाला. वादानंतर मारोतीने धारदार चाकूने वार करून विमलचा खून केला.

विमलला तातडीने आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रक्तस्त्राव वाढल्याने विमलला तातडीने यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले.

मात्र, उपचार सुरू असताना दुपारी अडीचच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. दरम्यान, आर्णीचे एपीआय किशोर खंडार, ठाणेदार पितांबर जाधव, योगेश सुंकलवार, मिथुन जाधव, मनोज चव्हाण, अमित झेंडेकर यांनी घटनास्थळी येऊन मारोती आरके याला अटक केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

RECENT POSTS