धक्कादायक : महाविद्यालयीन विद्यार्थिनीची गळफास लावून आत्महत्या

0
62

नेर : शहरातील तेलीपुरा परिसरात वास्तव्यास असलेल्या श्रद्धा भास्कर हिवरकर (वय 20 वर्ष) या तरुणीने राहत्या घरात ओढणीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली.

ही तरुणी शहरातील नेहरू महाविद्यालयात कला शाखेत द्वितीय वर्षात शिकत होती. ही तरुणी आपल्या कुटुंबियांसह भाड्याच्या घरात राहात होती.

घटनेच्या दिवशी आई, वडील मूळगावी गेल्याने ही विद्यार्थिनी घरी एकटीच होती. घटना उघडकीस आल्यानंतर पोलिस ठाणे तथा मुलीच्या वडिलांना या घटनेची माहिती देण्यात आली.

या तरुणीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. नेर पोलिस ठाण्याचे ठाणेदार ज्ञानेश्वर घुगे व सहकारी या घटनेमागील कारणाचा शोध घेण्याच्या दृष्टीने तपास करीत आहेत.