Crime News : पिंपरी चिंचवडमध्ये नराधम वडिलांकडून स्वतःच्याच 15 वर्षीय मुलीचा विनयभंग

Pimpri: Frequent sexual assault on a young woman by her mother's boyfriend, a case filed

पिंपरी-चिंचवड : समाजात महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे; तर दुसरीकडे नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तींकडून अत्याचार करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.

गेल्या आठवड्यात पुणे आणि चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलीची फसवणूक, मारहाण आणि विनयभंगाची तिसरी घटना उघडकीस आली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये पित्याने आपल्याच १५ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तिचे वडील गेल्या 20 दिवसांपासून हा गुन्हा करत होते.

तक्रार दाखल होताच पोलिसांनी वडिलांना अटक केली आहे. तक्रारीनुसार, आरोपी वडील दररोज रात्री पीडितेचा विनयभंग करत होते.

चिमुरडीचे लैंगिक शोषण केले

दुसरीकडे, पिंपरी चिंचवडमधील सीएमई लष्कर परिसरात एका दोन वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित चिमुरडीच्या आईने पोलिसांत फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी आरोपी कुलेश्वर ठाकूर (25) याला अटक करण्यात आली आहे. फिर्यादी महिलाही मुळची झारखंडची असून दिघी येथे मजुरीच्या कामासाठी राहते.

असा झाला उलघडा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ठाकूर पीडित चिमुकलीला बिस्कीट खाऊ घालतो. त्यानंतर चिमुकलीला सीईएम आर्मी परिसरातील झाडाच्या आडोशाला नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

यानंतर घरी काही बोलू नये म्हणून त्याने तिच्या गालावर मारहाण केली. पीडित चिमुकली घरी आली असता तिचा गाल सुजलेला दिसला. त्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला आणि घटनेची उकल झाली.