मुंबई : मालिका, चित्रपट किंवा वेब सीरिजमध्ये हल्ली कथानकाच्या आवश्यकतेनुसार बोल्ड आणि इंटिमेट सीनचा सतत भरणा पाहायला मिळतो.
अनेकदा तर मालिकेच्या कथानापेक्षा सर्वाधिक चर्चा होते ती या बोल्ड सीनची. असंच काहीसं पाहायला मिळालं होतं, ‘सेक्रेड गेम्स’ या सीरिजबाबत.
अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी, सैफ अली खान आणि सहकलाकारांतच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या सीरिजमध्ये काही नवी नावंही प्रकाशझोतात आली.
यातलंच एक नाव म्हणजे अभिनेत्री राजश्री देशपांडे. राजश्रीनं या सीरिजमध्ये नवाझच्या पत्नीची म्हणजेच सुभद्राची भूमिका साकारली होती.
या सीरिजच्या निमित्तानं तिनं काही बोल्ड सीनही दिले. राजश्रीने दिलेले हे इंटिमेट सीन भलतेच गाजले. काहींना ते रुचले तर काहींनी तिची यावरून खिल्ली उडवली. पण, आपण एक कलाकार असल्याचं म्हणत तिनं सर्वांनाच एका उत्तरानं शांत केलं.
अशी ही अभिनेत्री तिच्या कामावरच लक्ष केंद्रीत करताना दिसली. आज सीरिज प्रदर्शित होऊन बराच काळ लोटला. पण, राजश्री मात्र अद्यापही तिच्या इंटिमेट सीनमुळं चर्चेत आहे.
शिवाय सध्या ती विविध प्रोजेक्टवरही काम करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं एक नवं फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलं होतं. यामध्ये ती काळ्या रंगाच्या लांब बाह्या असणाऱ्या आऊटफिटमध्ये दिसत आहे.
राजश्रीला लूक आणि तिची रोखलेली नजर या फोटोशूटला चार चाँद लावून जात आहे. मुख्य म्हणजे ती सध्या काय करते, हा प्रश्न पडणाऱ्यांसाठी हे फोटोशूट सर्वकाही सांगून जात आहे, असं म्हणायला हरकत नाही.