Vespa 4 नवीन रंगांमध्ये आकर्षक व्हेरिएंट लॉन्च, जाणून घ्या किंमत

Vespa Elettrica electric scooter to launch in India soon; Know the specs, price, and features

Vespa Launches 4 Attractive Variants in New Colors : पियाजिओ व्हेईकल्स प्रा. लि. व्हेस्पा, या इटालियन पियाजिओ ग्रुपची स्कूटर भारतातील तरुणांमध्ये प्रचंड पसंतीस उतरली आहे. या स्कूटरची आकर्षक रचना, रंग, इंजिन आणि बिल्ड क्वालिटी यामुळे ग्राहकांकडून या स्कूटरची चांगली विक्री झाली आहे.

Piaggio कंपनीने चार नवीन आकर्षक रंगांमध्ये Vespa लाँच केली आहे. नवीन व्हेस्पाचे रंग मिडनाईट डेझर्ट, टस्कनी सनसेट, जेड स्ट्रीक आणि सनी एस्केप आहेत.

Vespa SXL स्पोर्टची मर्यादित आवृत्ती मिडनाईट डेझर्ट, टस्कनी सनसेट आणि सनी एस्केप या नवीन रंगांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे.

Vespa SXL Racing 60S विद्यमान व्हाईट कलर स्कीम व्यतिरिक्त, जेड स्ट्रीक या नवीन रंगात लॉन्च करण्यात आला आहे. Vespa SXL मॉडेल आता मिडनाईट डेझर्ट आणि टस्कनी सनसेट या दोन नवीन रंगांमध्ये उपलब्ध असतील.

पियाजिओ व्हेईकल्स प्रा. लि.चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डिएगो ग्राफी म्हणाले, भारतीय ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर नवीन शैली आणि आकर्षक वेस्पा लाँच करताना आम्हाला आनंद होत आहे.

व्हेस्पा ही केवळ स्कूटर नाही तर इटालियन जीवनशैली आणि वारशाचे प्रतीक आहे. वेस्पाला भारतात खूप प्रेम मिळाले आहे.

व्हेस्पाचा नवीन कलर पोर्टफोलिओ ग्राहकांना त्यांच्यासाठी सर्वोत्तम प्रकार निवडण्यासाठी लॉन्च केला जात आहे. व्हेस्पाचे नवीन प्रकार भारतीयांच्या व्यक्तिमत्त्वाशी जोडले जातील आणि त्यांना एक अनोखा रायडिंग अनुभव देईल.

याची आम्हाला खात्री आहे. Vespa चे SXL रूपे नवीन रंगांमध्ये 1 डिसेंबर 2022 पासून भारतातील सर्व डीलर्सवर उपलब्ध होतील.

वेस्‍पा एसएक्‍सएल स्‍पोर्ट (लिमिटेड एडिशन)
किंमत (एक्‍स-शोरूम, महाराष्‍ट्र)
SXL125 : 1,31,984 रूपये
SAXL150 : 1,45,936 रूपये

वेस्‍पा एसएक्‍सएल
किंमत (एक्‍स-शोरूम, महाराष्‍ट्र)
SXL125 : 1,31,984 रूपये
SAXL150 : 1,45,936 रूपये

वेस्‍पा एसएक्‍सएल रेसिंग 60एस
किंमत (एक्‍स-शोरूम, महाराष्‍ट्र)
SXL125 : 1,37,805 रूपये
SAXL150 : 1,51,604 रूपये