Crime News | फेसबुक आणि व्हॉट्सअपवर एडिट केलेले अश्लील फोटो पाठवून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलांना ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपीने 85 हून अधिक महिलांना ब्लॅकमेल केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याच्यावर आयटी कायद्यान्वये कारवाई करण्यात येत आहे.
महिलांना ब्लॅकमेल करून आरोपी त्यांच्याकडून नग्न फोटो आणि व्हिडिओ मिळवायचा. फरिदाबादच्या महिला ठाण्याच्या एनआयटीच्या प्रभारी निरीक्षक माया आणि त्यांच्या टीमने 4 महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर आरोपीला अटक केली आहे.
पोलिस प्रवक्ते सुबे सिंग म्हणाले, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव गणेश (वय 42) असे आहे. तो व्यवसायाने ट्रक चालक आहे.
गणेशविरुद्ध महिला पोलिस ठाण्यात एनआयटीमध्ये आयटी कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, 6 मे 2022 रोजी तिला व्हॉट्सअपवर एक मेसेज आला.
त्यात तिचा एक अश्लील फोटो होता. तिचा चेहरा काही अश्लील फोटोशी जोडला होता. फोटो पाठवणाऱ्या आरोपीने त्याचा नंबर ब्लॉक केल्यास हा फोटो व्हायरल करू, अशी धमकी दिली.
यानंतर महिलेने या प्रकरणाची माहिती पतीला दिली. महिलेच्या पतीने त्या नंबरवर फोन केला असता तो बंद होता. यानंतर ही बाब पोलिसांना कळवण्यात आली.
स्टेशनच्या प्रभारी निरीक्षक माया यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून पोलिसांनी छापा टाकला. तब्बल 4 महिन्यांनंतर पोलिसांनी आरोपीला रविवारी अलीगड येथून अटक केली.
फेसबुकवर महिलांशी संपर्क साधायचा
चौकशीदरम्यान, आरोपीने सांगितले की तो फेसबुकवर महिलांचा शोध घेत असतो आणि एका नग्न महिलेच्या फोटोमध्ये प्रोफाइल फोटो जोडून संपादित करत असे. यानंतर तो फेसबुक मेसेंजर आणि फेसबुकवरून महिलेचा नंबर घेऊन व्हॉट्सअपवर फोटो पाठवत असे.
यासोबतच फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करत असे. आरोपी महिलांना ब्लॅकमेल करून त्यांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ मिळवत होता. महिला त्याच्या धाकाला व सामाजिक बदनामीला भिऊन त्याला फोटो, व्हिडिओ पाठवत होत्या.
महिला पोलिसांनी पीडित महिलांशी चर्चा केली असता अनेक महिला आरोपींच्या जाचाला व त्रासाला कंटाळल्याचे समोर आले. घरची बदनामी व सामाजिक भीतीने महिलांनी कधीही आरोपीविरुद्ध पोलिसांत तक्रार केली नाही.
अनेक व्हिडिओ सापडले
पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून जप्त केलेला मोबाईल तपासला. त्याच्या फेसबुक मेसेंजरवर सुमारे 60 महिलांशी आक्षेपार्ह चॅट आढळून आले.
याशिवाय आरोपींच्या व्हॉट्सअपवर 25 महिलांना केलेले आक्षेपार्ह मेसेजही आढळून आले आहेत. आरोपीच्या मोबाईलमध्ये 485 अश्लील व्हिडीओ सापडले, त्यातील काही व्हिडीओच्या मदतीने महिलांना ब्लॅकमेल केले आहे.
काही व्हीडीओ व फोटो इंटरनेटवरून डाउनलोड केले होते. आरोपीला या सिमबाबत चौकशी केली असता त्याने हे सिम राजस्थानमधील ढाब्याजवळ मिळाल्याचे सांगितले.
याचा वापर करून तो महिलांना ब्लॅकमेल करू लागला. आरोपीने सांगितले की तो पैशासाठी महिलांना ब्लॅकमेल करत नाही, फक्त वेळ घालवण्यासाठी हे करीत आहे. आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी घेण्यात येणार आहे.
हे देखील वाचा
- Shringar Gauri-Gyanvapi Masjid Case : ज्ञानवापी मशिदीच्या निर्णयाबाबत उत्सुकता, न्यायालय परिसरात कडक बंदोबस्त
- PAN Card Update : पॅन कार्डशी संबंधित ही मोठी चूक महागात पडू शकते, 10 हजारांचा दंड भरावा लागेल, आयकर विभागाचा इशारा
- Swaroopanand Saraswati : हिंदूंचे महान धर्मगुरू शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांचे निधन
- देशात अल्पसंख्याक समाजाच्या विरोधात वातावरण निर्माण केले जात आहे; शरद पवारांचा भाजपावर हल्लाबोल