SSC Result 2022 : दहावीच्या निकालाची प्रतिक्षा संपली, महत्वाची अपडेट

SSC Result : महाराष्ट्र बोर्ड दहावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी आपल्या निकालाची प्रतिक्षा करीत आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, MSBSHSE) घेतलेल्या इयत्ता दहावी अंतिम परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे.

विविध अहवालांनुसार १५ जूनपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीच्या निकालाची तारीख आणि वेळ अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आली नाही.

त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटला भेट देत राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

यासोबतच विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी की निकाल जाहीर झाल्यानंतर पुढे देण्यात आलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करून विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहू शकतील.

SSC Result 2022: असा तपासा निकाल

  • दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पाहण्यासाठी, विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in वर जा.
  • वेबसाइटच्या होमपेजवर एसएससी निकाल २०२२ ची लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर Now वर क्लिक केल्यानंतर DOB सोबत तुमचा रोल नंबर किंवा नाव भरा.
  • पुढील पेजवर तुम्ही तुमचा महाराष्ट्र एसएससी निकाल २०२२ पाहू शकाल.
  • प्रत्येक विषयातील तुमचे गुण तपासा.
    निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.
  • महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान ३५% गुण मिळणे आवश्यक आहे.

बोर्डाने मार्च महिन्यात दहावीच्या परीक्षा घेतल्या होत्या. यावेळी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आल्या.

१५लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेत भाग घेतला होता. तर गेल्यावर्षी म्हणजेच २०२१ मध्ये जुलै महिन्यात निकाल जाहीर झाला होता.