कौठा येथील तरुण वाढदिवसानिमित्त इतर खर्च टाळून वृक्षारोपण करणार

कौठा : कंधार (जि.नांदेड) येथील वन्स अपॉन ग्रूप तर्फे प्रत्येक सदस्याचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा करण्याचे ठरवले आणि अवास्तव होणारा खर्च टाळण्यात आला.

वटपौर्णिमा निमित्ताने कौठा गावात नवीन उपक्रमाला सुरुवात कारण आली. गावातील तरुणांनी रवि हात्ते या मित्राचा वाढदिवस आज झाडाचे रोपण करून आणि त्या झाडाचे जोपासना करण्यासाची शपथ देऊन साजरा केला.

गावातील तरुणांनी उपस्थित राहून उपक्रमास प्रतिसाद दिला त्यावेळी उपसरपंच गंगाधर हाते, नुरूदीन सर, राजेश पावडे, गणेश बिडवे, धुमाळ सर, बालाजी पालीमकर, साईनाथ महाजन, शिवहार कापसे, किरण शहाणे, राजू कापसे, सचिन उपलंचवार, किरण देशमुख, बाळू देशमुख, डॉ. मुद्दे, साई मोरलवार, गजानन मोरलवार, प्रभाकर पांडे आदी उपस्थित होते.