बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Bollywood actress Sonakshi Sinha) गेल्या काही दिवसांपासून तिचे लग्न आणि बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. सध्या सोनाक्षी तिच्या फाटक्या कपड्यांमुळे पुन्हा चर्चेत आली आहे.
तासाभरापूर्वी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने तिच्या इंस्टाग्रामवर रंगीबेरंगी शर्ट आणि शॉर्ट्समधील स्वतःचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये सोनाक्षीने तिची पेंटिंग चित्रात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
याशिवाय तिच्या आजूबाजूला वेगवेगळे रंगही पाहायला मिळतात. यात विशेष म्हणजे सोनालीने परिधान केलेला शर्ट आणि आजूबाजूचा रंग सारखाच दिसतो.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये ती म्हणते की ही एक वास्तविक आणि अद्वितीय कलाकृती आहे. सोनाक्षीने तिच्या शर्टला बेल्ट घातला असून फोटोत तिने हॉट पोज दिली आहे.
हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच काही नेटकऱ्यांनी त्याला लाइक केले. काही नेटिझन्सना ते अजिबात आवडले नाही.
फोटोवर कमेंट करताना काही नेटकऱ्यांनी सोनाक्षी सिन्हाला ट्रोल करत, “सोनाक्षीने लहानपणीचा ड्रेस घातला आहे का?” याशिवाय तिने आणखी एका ब्लॅक कट साइट वनपीसमध्ये फोटोशूट केले आहे.
तिची पोनी हेअर स्टाइल आणि मेकअप तिच्या सौंदर्यात भर घालतो. सोनाक्षीच्या इंस्टाग्रामवर तिचे लेटेस्ट हॉट फोटो पाहायला मिळतात. या फोटोला आतापर्यंत 20,000 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
सोनाक्षी सिन्हाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती ‘काकुडा’ आणि ‘डबल एक्सएल’मध्ये दिसणार आहे. सोनाक्षी सिन्हा शेवटची ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात दिसली होती. गेल्या काही दिवसांपासून तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबतचे नाते चर्चेत आले आहे.