गौतम बुद्ध नगर : महिला सुरक्षेचे लाखो दावे करूनही उत्तर प्रदेशात बलात्कारासारख्या घटनांना आळा बसत नाही आहे.
राज्यातील गौतम बुद्ध नगरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिथे एका 3 वर्षाच्या मुलीसोबत डिजिटल रेपची घटना घडली आहे.
तीन वर्षीय मुलगी प्ले स्कूलमध्ये शिकत असून, तिच्यासोबत ही घटना घडली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
गौतम बुद्ध नगरमध्ये राहणाऱ्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्याची ३ वर्षांची मुलगी प्ले स्कूलमध्ये शिकते, जिच्यासोबत डिजिटल बलात्काराची घटना शाळेतच घडली होती.
चिमुकलीने तिच्या खाजगी भागामध्ये दुखत असल्याची तक्रार कुटुंबीयांकडे केली होती, त्या आधारे मुलीच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाची पोलिसात तक्रार केली.
ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
डिजिटल बलात्कार म्हणजे काय?
लोक अजूनही डिजिटल बलात्काराला फोन किंवा इंटरनेटवर होणाऱ्या शोषणाशी जोडतात. वास्तविक डिजिटल बलात्कार म्हणजे, जे शोषण हाताची आणि पायाच्या बोटांनी केले जाते.
एखाद्या स्त्रीचे किंवा मुलीचे हाताच्या आणि पायाच्या बोटांनी शोषण होते. त्याला ‘डिजिटल रेप’ म्हणतात. निर्भया प्रकरणानंतर हा कायदा जोडण्यात आला.
डिजिटल हा शब्द का जोडला गेला?
इंग्रजीत अंक म्हणजे डिजिट, तर इंग्रजीमध्ये बोटं, अंगठा, पायाचे बोटं यालाही डिजिट म्हणतात. जर एखाद्या पुरुषाने एखाद्या महिलेची किंवा मुलीच्या तिच्या संमतीशिवाय खाजगी भागात हाताची, पायाची बोटे किंवा अंगठ्याने छेडछाड केली तर त्याला डिजिटल बलात्कार म्हणतात.