आईच्या गैरहजेरीत बापच पोटच्या मुलींवर करायचा बलात्कार, असा झाला खुलासा

1
UP Crime News: Gangrape victim raped by police at police station; Irritable type in Uttar Pradesh

जौनपूर : उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये बापलेकीच्या नात्याला लाजवणारी घटना घडली आहे. नराधम बापान आपल्याच अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.

या धक्कादायक घटनेची फिर्याद पीडित मुलींच्या आईने पोलिसांत दिली आहे.

जौनपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शैलेंद्र कुमार सिंह यांनी सांगितले की, आईने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत, अल्पवयीन मुलींवर त्यांच्या वडिलांसह आणखी दोन ते तीन जणांनी नशेचे पदार्थ पाजून अनेक महिन्यांपासून त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.

क्रूरतेची हद्द ओलांडून केलेलं कृत्य उघड केल्यास मुलींसह आईला जीवे मारण्याची धमकीही वडिलांनी देत ​​राहिल्याचा आरोप आहे.

पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून सुरेरी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपी धीरज पांडेला अटक केली.

अतिरिक्त पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, जिल्ह्यातील सुरेरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील दोन अल्पवयीन मुलींनी त्यांच्या वडिलांसह इतर दोन ते तीन जणांवर अनेक महिन्यांपासून दुष्कृत्य केल्याचा आरोप करत पीडित मुलींच्या आईमार्फत पोलिस ठाण्यात अर्ज दाखल केला आहे.

पीडित मुलींची आई ब्युटी पार्लर चालवायची. आई घरी नसताना वडील अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन करायचे.

यासोबतच ही बाब उघड केल्यास आईसह जीवे मारण्याची धमकीही तो देत होता. त्यामुळे मुलींनी त्यांच्या आईलाही याची माहिती दिली नाही.

याचदरम्यान वडील आपल्या एका मुलीसह मुंबईला गेल्याचा आरोप आहे. तिथेही त्याने आपल्या १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर एकट्याने काही दिवस जबरदस्तीने बलात्कार केला.

त्यानंतर नशा करून इतर दोन-तीन साथीदारांसह मुलीवर बलात्कार केला. वडिलांच्या या कृत्याने त्रस्त झालेल्या अल्पवयीन मुलीने मुंबईहून जौनपूर येथील गावी परतल्यावर हिंमतीने आईला याबाबत माहिती दिली.

धाकट्या बहिणीचे धाडस पाहून मोठ्या मुलीनेही आपबिती आईला सांगितली. दोन्ही मुलींनी त्यांच्या आईसह सुरेरी पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी लेखी तक्रार दिली.

पोलिसांनी आरोपी वडील धीरज पांडेविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.