Shiv Sena Leader Swapnali Sawant Missing | रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्या व माजी पंचायत समिती सभापती स्वप्नाली सुकांत सावंत या गेल्या 10 दिवसांपासून बेपत्ता असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
दरम्यान, या प्रकरणात एक मोठा अपडेट समोर आला आहे. यापूर्वीही पोलिसांनी या प्रकरणात अपघाती मृत्यूचा संशय व्यक्त केला होता. याप्रकरणी आता संशयाची सुई स्वप्नालीचा पती सुकांत सावंत यांच्याकडे वळली आहे.
अकरा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या स्वप्नाली सावंत प्रकरणी तिच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पती सुकांत सावंत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत या अकरा दिवसांपासून बेपत्ता आहेत. आपल्या मुलीला पतीनेच जाळून मारल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. पती सुकांत सावंत याच्यासह अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
पती सुकांत सावंत यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी स्वप्नाली सावंतचा शोध सुरू केला आहे. स्वप्नाली सावंत या 1 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घरातून कोणालाही न सांगता अचानक गायब झाल्या आहेत.
सुकांत सावंत आणि त्यांची पत्नी स्वप्नाली सावंत यांच्यात गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू होता. अनेकवेळा हा वाद चव्हाट्यावरही आला.
तसेच विविध तक्रारींच्या आधारे पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, तिचा पती सुकांत सावंत यांनी त्या बेपत्ता झाल्याची तक्रार दिल्याने रत्नागिरीत खळबळ उडाली आहे.