Pune Cime News : तरुणीचा पाठलाग करत चौघांनी तिला पकडून तिच्या तोंडात मिरची आणि डोळ्यात मिरची पावडर टाकली. तसेच, तिच्या सर्व कपड्यांवर आणि प्रायव्हेट पार्टवर दारू ओतून तिच्या हातावर ब्लेडने वार केले.
हि धक्कादायक घटना गुरुवारी (22 सप्टेंबर) दुपारी बाराच्या सुमारास निगडीतील गंगानगर येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
याप्रकरणी पीडितेच्या 32 वर्षीय बहिणीने गुरुवारी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चेतन मारुती घाडगे (31, रा. गुरुद्वारा रोड, औंध गाव, पुणे) याच्यासह तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपी चेतन घाडगे याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27वर्षीय पीडित तरुणी गुरुवारी गुरुदेवनगर येथील बेल्हेश्वर मंदिरातून परतत होती.
पीडित मुलगी रस्त्यावरील एका मका विक्रेत्याकडून मका विकत होती. त्याचवेळी आरोपी चेतन घाडगे व तीन साथीदार तिथे आले. तरुणीला पाहताच त्याने ‘कोयता बाहेर काढ, तिला मार’ असा दम दिला. त्यामुळे तरुणीने तेथून पळ काढला.
मुलगी रस्त्याने धावत असताना आरोपीने तिचा पाठलागही सुरू केला. त्यामुळे मुलगी गुरुदेवनगर येथील सार्वजनिक शौचालयात जाऊन लपली. आरोपीही तिच्या मागे धावत शौचालयात घुसला.
त्यांनी युवतीला पकडून तिच्या अंगावर आणि प्रायव्हेट पार्टवर दारू ओतली. तिला मिरची पावडर खाऊ घालण्यात आली आणि डोळ्यात घातली.
त्यानंतर त्याने तिच्या हातावर ब्लेडने वार केले. तिचे सर्व कपडे फाडून आरोपीने तेथून पळ काढला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उत्तम ओमासे करीत आहेत.