Man Killed Sister In Law : दाजीचे मेहुणीसोबत अनैतिक संबंध, तिची केली हत्या आणि नंतर रचला बनाव

Man Killed Sister In Law

Man Killed Sister In Law | नाशिक : जमिनीच्या वादातून महिलेची हत्या करून आरोपींनी घर पेटवून दिल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल करण्यात आली होती. तपासात जेव्हा सत्य बाहेर आले तेव्हा याप्रकरणी आरोपीनेचं पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याचे आढळून आले.

मात्र, पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवून चौकशी करताच आरोपीने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. खून झालेली महिला ही आरोपीची मेहुणी होती.

आरोपी आधीच विवाहित होता. त्याला दोन मेहुण्या आहेत, ज्यापैकी पहिल्या बहिणीसोबत त्याने लग्न झाले होते. त्याचे दुसऱ्या बहिणीशीही अवैध संबंध होते.

मात्र दाजीने अनैतिक संबंधातून लग्नासाठी बळजबरी करणाऱ्या मेहुणीची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

हा तरुण नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील आधारवाड येथील कातकरी वस्तीचा आहे. शरद महादू वाघ असे आरोपीचे नाव आहे.

असे होते सुरुवातीला

आज (11 जून) पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास जमिनीच्या जुन्या वादातून 10-15 जण घरी आले. त्यांनी घर पेटवून दिले आणि एका महिलेची हत्या केली. याशिवाय कातकरी कुटुंबांची तीन घरे जाळण्यात आली.

शरद महादू वाघ यांनी घोटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर तक्रारदारचं आरोपी असल्याचे समोर आले. अनैतिक संबंधातून लग्नासाठी बळजबरी करणाऱ्या मेहुणीची हत्या केली असल्याचे दिसून आले.

आरोपी शरद वाघ हा इगतपुरी तालुक्यातील आधारवाड येथील कातकरी येथे राहतो. शरद वाघ यांचे दोनदा लग्न झाले आहे. विवाहित असतानाच त्यांने बायकोच्या बहिणीशी दुसरे लग्न केले.

गेल्या वर्षी त्याच्या घटस्फोटित दुसऱ्या मेहुणी सोबतही त्याचे अफेअर होते. तिने शरदला लग्नाचा तगादा लावला होता. मात्र, शरदने तिसऱ्या लग्नाला नकार दिला होता.

तेव्हा दुसऱ्या बहिनीने घराला आग लावून ते जाळून टाकण्याची धमकी दिली होती. या घटनेमुळे संतप्त झालेल्या शरदने दुसऱ्या बहिणीच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केली.

त्यानंतर घाबरलेल्या शरदने हे घडलेले प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून लक्ष्मीचा खून केल्याचे नाटक केले. मात्र पोलिसांच्या तपासात सत्य बाहेर आले.

खुनावर पांघरूण घालण्यासाठी बनाव 

एक दिवसापूर्वी जमिनीच्या वादातून शरदचे काही लोक शरदकडे आले होते. त्यावेळी पाटील ग्रामस्थ पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने वाद मिटवण्यात आला. मात्र, या वादाचा आधार घेत शरदने लक्ष्मीचा काटा काढला. 11 रोजी पहाटे 3 वाजता ही घटना घडली.