Lata Mangeshkar | विवाहित नसूनही लतादीदी का लावायच्या सिंदूर? दीदींच्या सिंदूर लावण्यामागचं कारण आलं समोर

Lata Mangeshkar wear vermilion even though she is not married?

मुंबई : भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर अर्थातचं आपल्या लतादीदी आज आपल्यात नाहीत, पण त्यांच्या आठवणी कायम आपल्यात जिंवत राहतील.

6 फेब्रुवारी रोजी दीदींनी अखेरचा श्वास घेतला आणि एका पर्वाचा अंत झाल्या. देशाला दीदी पोरक करून गेल्या. पण अनेक महत्त्वाच्या गोष्टी प्रत्येकाला शिकवून गेल्या. दीदींनी त्यांच्या संगीताच्या माध्यमातून अनेकांना प्रेम करायला शिकवलं, तर काहींना गाण्यासाठी प्रेरणा दिली.

आज लतादीदी अनेक गोष्ट मागे ठेवून गेल्या आहे आहेत. त्यातील एक म्हणजे दीदी लावत असलेल्या सिंदूरचं रहस्य. लतादीदी सिंदूर का लावायच्या याबद्दल तबस्सुम यांनी एका मुलाखतीत सांगितलं.

तबस्सुम यांनी सांगितलं की, ‘मी लता दीदींना विचारलं तुमचं लग्न झालं नाही. तरी देखील तुम्ही सिंदूर का लावता? याचं उत्तर देत दीदी म्हणाल्या, मी माझ्या संगीताच्या नावाचं कुंकू सिंदूर म्हणून लावते…’

लतादीदींनी दिलेलं हे उत्तर हृदय पिळवटून टाकणार आहे. लतादीदींनी उभ्या आयुष्यात संगीतावर आकंठ प्रेम केलं. त्यांनी 36 भाषांमध्ये जवळपास 50 हजारांपेक्षा अधिक गाणी गायली. आज देखील त्यांची गाणी जगण्यासाठी नवी उमेद देतात.