Lakhimpur Two Dalit Sisters Rape – Murder : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हत्याकांडात पीडित कुटुंबाने अल्पवयीन मुलींचे अंतिम संस्कार करण्यास होकार दिला आहे.
त्याचबरोबर पीडित कुटुंबाला स्थानिक प्रशासनाकडून आर्थिक मदतही जाहीर करण्यात आली आहे. बुधवारी संध्याकाळी निघासन परिसरात एका दलित कुटुंबातील दोन अल्पवयीन बहिणींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले होते. त्यापैकी एक 17 वर्षांची तर दुसरी 15 वर्षांची आहे.
याआधी मृतांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास नातेवाईकांनी नकार दिला होता. त्यांना शासनाकडून एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, त्यांच्या मुलाला गुणवत्तेनुसार सरकारी नोकरी मिळावी आणि सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी या कुटुंबाची मागणी होती.
आता राज्य सरकारनेही या कुटुंबांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. यानंतर मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक तयार झाले आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू केली, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
या घटनेनंतर जुनैद, सोहेल, हाफिजुर रहमान, करीमुद्दीन, आरिफ आणि छोटू यांना रात्रभर शोध मोहिमेदरम्यान अटक करण्यात आली, असे लखीमपूर खेरीचे पोलीस अधीक्षक (एसपी) संजीव सुमन यांनी सांगितले.
त्याचवेळी मुलींच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्यांच्यावर बलात्कार करून नंतर गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.
बुधवारी जिल्हा मुख्यालयापासून 60 किमी अंतरावर असलेल्या निघासन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उसाच्या शेतात दोन्ही बहिणींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले.
लखीमपूर खेरीचे पोलिस अधीक्षक संजीव सुमन यांनी सांगितले की, आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२, ३७६ आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसपी म्हणाले की, आरोपी हे मृत मुलींचे मित्र होते.
सोहेल आणि जुनैदने त्यांच्यावर बलात्कार केल्याचे सांगून त्याने काल मुलींना शेतात बोलावले होते. यानंतर मुलींनी त्याच्याकडे लग्नाची मागणी केल्यावर सोहेल आणि जुनैदसह हाफिजुलने दोघी बहिणींची गळा आवळून हत्या केली.
यानंतर त्याने करीमुद्दीन आणि आरिफला बोलावले आणि त्यांच्या मदतीने दोघांनाही झाडाला लटकवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी छोटूने दोन्ही बहिणींची या मुलांशी ओळख करून दिली होती, त्यामुळे त्यालाही अटक करण्यात आली आहे.
हे देखील वाचा
- Lakhimpur Rape-Murder Case: पोस्टमॉर्टम अहवालात अल्पवयीन बहिणींवर बलात्कार, हत्या झाल्याची पुष्टी
- Lakhimpur Murder and Rape Case : मला व माझ्या पतीला अर्धा तास पोलिस चौकीत मारहाण झाली, दोन्ही सख्ख्या बहिणींच्या आईचा आरोप
- Lakhimpur Two Dalit Girls Killed: दोन दलित मुलींची हत्या, लखीमपूर प्रकरणावर पोलिसांचा खुलासा आणि कुटुंबियांचा दावा