Lakhimpur Murder and Rape Case : मला व माझ्या पतीला अर्धा तास पोलिस चौकीत मारहाण झाली, दोन्ही सख्ख्या बहिणींच्या आईचा आरोप

Lakhimpur Murder and Rape

Lakhimpur Murder and Rape Case : लखीमपूर खेरी येथे दोन बहिणींचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. लखीमपूर खेरी येथील निघासन पोलीस स्टेशन हद्दीत काल उसाच्या शेतात दोन बहिणींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले.

मृताच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलींचे अपहरण करून त्यांच्यावर बलात्कार केल्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली असून, याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेऊन पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.

दोन्ही सख्या दलित बहिणींच्या आईने पोलिसांना मारहाण केल्याचा आरोप केला आहे. आज तकशी बोलताना मृताच्या आईने सांगितले की, जेव्हा ती आणि तिचा नवरा मदतीसाठी निघासन पोलिस चौकीत पोहोचले तेव्हा त्यांनाच मारहाण करण्यात आली. महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी अर्धा तास मारहाण केली आणि पतीलाही मारहाण केल्याचा आरोप आईने केला आहे.

मृताच्या आईचे म्हणणे आहे की, आम्ही पोलिस कर्मचाऱ्यांना दोन्ही मुलींना शोधून काढण्याची विनंती करत होतो, तेव्हा इथल्या पोलिस चौकीत तुमची मुलगी नाही, इथून जा, असे सांगून त्यांना तिथून हाकलून दिले.

सध्या गावात भीतीचे व संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, मृताच्या दोन्ही भावांनी आज तकला सांगितले की, त्या दोघीही त्यांच्यासाठी जेवण बनवायचे आणि ते एकत्र जेवायचे, आम्हाला कोणाच्या मदतीची गरज नाही.

आम्हाला फक्त चार आरोपींना फाशी हवी आहे, आज त्यांच्यासोबत हा प्रकार घडला. उद्या अजून कोणच्या बहिणींसोबत हे घडणार आहे. सध्या पोलिसांनी मुख्य आरोपी छोटूसह चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.

तीन तरुणांनी मुलीला ओढून नेले

याआधी मृत मुलींच्या आईने आरोप केला होता की, ‘बुधवारी दुपारी 3 तरुणांनी त्यांच्या मुलींना पळवून नेले आणि नंतर त्यांची हत्या करून मृतदेह झाडाला लटकवले.

या घटनेतील आरोपी शेजारील लालपूर गावातील रहिवासी आहेत. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेतील मुख्य आरोपी छोटू गौतम आहे.

छोटूच्या पत्नीने हे आरोप फेटाळून लावले आहेत

दुसरीकडे, छोटूची पत्नी सरोजिनी म्हणाली की, बुधवारी दुपारी 2:00 वाजता छोटू मांढाळेपुरवा छठीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेला होता, संपूर्ण गावासमोर छोटू तिथेच थांबला होता.

सायंकाळी 7 वाजेपर्यंत माझ्या पती छोटूचे नाव पुढे येऊ लागले. तेव्हा आम्ही स्वतः त्याला फोन करून बोलावले, छोटू घराबाहेर पोहोचताच पोलिस आधीच हजर होते आणि त्याला घेऊन गेले. छोटूच्या इतर तीन साथीदारांबद्दल आम्हाला माहिती नाही आणि त्यांच्याशी छोटूचा काही संबंध नाही.