कर्नाटक : हिजाबच्या वादानंतर मुस्लिमांना महालिंगेश्वर मंदिराच्या जत्रेत दुकान लावण्यावर बंदी

Karnataka: Muslims banned from setting up shop at Mahalingeshwar temple fair after hijab controversy

बंगलोर, 23 मार्च : गेल्या आठवड्यात कर्नाटक उच्च न्यायालयाने शाळा-महाविद्यालयांमध्ये हिजाब परिधान करण्यावर बंदी घातली होती, मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही कर्नाटकातील हिजाब परिधान थांबण्याचे नाव घेत नाही आहे.

अनेक मुस्लिम संघटना याला सातत्याने विरोध करत आहेत. या संघटनांनी गेल्या आठवड्यात राज्यात बंदची हाकही दिली होती.

दरम्यान, आता कर्नाटकातील सीमावर्ती भागात होणाऱ्या जत्रांमध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना दुकान थाटण्यास मनाई केली जात असल्याचे वृत्त आहे.

इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्रानुसार, उजव्या विचारसरणीच्या हिंदू संघटना कथितरित्या आयोजन समित्यांवर दबाव आणत आहेत.

येथे होणाऱ्या जत्रांमध्ये मुस्लिमांनी आपली दुकाने लावण्याला मनाई करावी असा आग्रह धरीत आहेत. कर्नाटक उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमधील हिजाबवरील बंदी कायम ठेवल्यानंतर अनेक मुस्लिम दुकानदारांनी निषेध म्हणून दुकानांचे व्यवहार ठप्प करून निषेध नोंदविला आहे.

मुस्लिमांच्या प्रवेशावर बंदी

वार्षिक उत्सवादरम्यान, एप्रिल-मे महिन्यात राज्याच्या किनारी भागातील मंदिरांमध्ये जत्रा भरतात. त्यातून करोडोंचा महसूल मिळतो.

धार्मिक भावना तीव्र असतानाही अशा सणांमध्ये कोणत्याही समाजाच्या व्यवसायाचे नुकसान झाल्याचे यापूर्वी कधीही दिसले नाही.

मात्र उच्च न्यायालयाच्या हिजाबच्या निर्णयावर मुस्लिमांनी पुकारलेल्या बंदनंतर, प्रदेशातील अनेक मंदिरांनी मुस्लिमांना त्यांच्या सणांना उपस्थित राहण्यास बंदी घातली आहे.

मुस्लिमांना लिलावात परवानगी नाही

20 एप्रिल रोजी होणाऱ्या महालिंगेश्वर मंदिराच्या वार्षिक उत्सवाच्या आयोजकांनी मुस्लिमांना लिलावात सहभागी होण्यास बंदी घातली आहे. ३१ मार्च रोजी होणाऱ्या बोलीमध्ये फक्त हिंदूच सहभागी होऊ शकतील, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

मात्र, मंदिर प्रशासनाने याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे. त्याचप्रमाणे, उडुपी जिल्ह्यातील कौप येथील होसा मरीगुडी मंदिराने या आठवड्यात होणाऱ्या वार्षिक जत्रेसाठी १८ मार्च रोजी झालेल्या लिलावात मुस्लिमांना स्टॉल देण्यास नकार दिला.

मंदिर प्रशासन समितीचे अध्यक्ष रमेश हेगडे म्हणाले की, दुकानांच्या लिलावात फक्त हिंदूंनाच सहभागी होण्याची परवानगी देणारा ठराव त्यांनी मंजूर केला आहे.

हिंदू संघटना नाराज का?

वृत्तपत्रानुसार, हिंदू जागरण वेदिकेच्या मंगळुरु विभागाचे सरचिटणीस प्रकाश कुक्केहल्ली यांनी सांगितले की, हिजाबबाबत उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मुस्लिमांनी त्यांची दुकाने बंद ठेवून निषेध केल्यानंतर स्थानिक मंदिरातील उपासक व भाविक संतप्त झाले.

दक्षिण कन्नड जिल्ह्यात, बाप्पांडुई श्री दुर्गापमेश्वरी मंदिराच्या वार्षिक उत्सवाच्या एका होर्डिंगमध्ये म्हटले आहे, जे कायद्याचा आदर करत नाहीत आणि आम्ही ज्या गायींची पूजा करतो.

त्या गोवंशाची हत्या करतात, त्याचे मांस खातात. राष्ट्रीय ऐक्याच्या विरोधात जे वागत आहेत त्यांच्यावर बंदी घातलीच पाहिजे.

त्यांना मंदिराच्या आवारात व्यवसाय करण्यास परवानगी देणार नाही. जे हिंदू जागरूक आहेत, ते मन्दिर व्यवस्थापनाला समर्थन करतील असे म्हटले आहे.

काय कारवाई होणार?

मंगळुरू शहराचे पोलिस आयुक्त एन शशी कुमार म्हणाले, हे पोस्टर्स कोणी लावले आहेत हे आम्ही शोधत आहोत. नागरी संस्था तक्रार दाखल करण्यास तयार असल्यास, आम्ही आमच्या कायदेशीर टीमचा सल्ला घेऊ आणि त्यानुसार कारवाई करू.

RECENT POSTS