Crime News : सांगलीत भररस्त्यात तरुणाचा निर्घृण खून, कारण अस्पष्ट

Crime News: Brutal murder of a young man in Sangli, the reason is unclear

सांगली : सांगलीतील लक्ष्मीनारायण कॉलनी, 100 फूट रोड येथे राहणार्‍या रोहन चंद्रकांत नाईक (28) यांचा सिव्हिल हॉस्पिटल ते बस स्टँड या रस्त्यावर धारदार वस्तूने वार करून खून करण्यात आला.

ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. हल्ल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र रोहनचा त्यापूर्वीच मृत्यू झाला होता.

सांगली जिल्ह्यातील हरिपूर येथे सोमवारी रात्री आरटीओ एजंटच्या हत्येनंतर आज मुख्य रस्त्यावर आणखी एक खुनाची घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. घरफोडीच्या कारणाचा पोलीस तपास करत आहेत.