कोचिंग क्लास चालकाची चिमुरड्याला अमानुष मारहाण, सोशल मिडीयावर व्हीडीओ व्हायरल

Coaching class driver inhumanely beats Chimurdya, video goes viral on social media

बिहार : बिहारची राजधानी पाटण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पाच वर्षाच्या मुलाला कोचिंग शिक्षिकेने एवढी मारहाण केली की तो बेशुध्द झाला. त्यानंतर मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या प्रकरणाचा एक व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शिक्षक एका निष्पाप चिमुकल्या मुलाला मारहाण करताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पाच वर्षांच्या चिमुरड्याला अमानुष मारहाण

कोचिंग क्लासमध्ये एका विद्यार्थ्याला शिक्षकाने अमानुष मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर गावकऱ्यांनी नंतर कोचिंग क्लासमधील शिक्षकाला बदडून काढले आहे.

एका कोचिंग क्लासमध्ये शिक्षक पाच वर्षांच्या मुलाला इतर मुलांसमोर मारहाण करताना कॅमेऱ्यात कैद झाला होता. विद्यार्थ्याला नराधम क्रूर शिक्षिकाने लाथाबुक्क्याने मारहाण केली. त्याच्या किंकाळ्या हृदयद्रावक होत्या.

शिक्षकाने विद्यार्थ्याला आडवे पाडून मारले

या क्रूर शिक्षकाने विद्यार्थ्याच्या पार्श्वभागावर लाकडी फटीने वार केले. शिक्षकाने जोरात मारहाण केल्याने विद्यार्थी किंचाळत होता, गयावया करीत होता, रडत होता. मात्र शिक्षकाने तिला मारहाण करणे थांबवले नाही.

एवढ्यावरच न थांबता शिक्षकाने मुलाला कानफटीत मारले.  आडवे पडल्यावर उचलून जमिनीवर आपटले. यानंतरही शिक्षक थांबला नाहीत. शिक्षकाने विद्यार्थ्याच्या पाठीवर लाथा बुक्या घातल्याचे व्हायरल व्हिडिओ मध्ये दिसत आहे.

बेशुद्ध पडल्यानंतर मुलाला रुग्णालयात नेण्यात आले

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण राजधानी पाटणा येथील जया कोचिंग क्लासचे आहे. कोचिंग सेंटरमध्ये एका मुलाला शिक्षकाने मारहाण केल्याचा प्रकार व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये शिक्षक निष्पाप मुलाला काठीने मारहाण करत आहे. लाकडी फळी मारून तुटल्यावरही शिक्षकाचा राग शांत झाला नाही. यानंतर, शिक्षकाने मुलाच्या तोंडावर चापट मारली आणि केस ओढले.

दरम्यान, वेदनेने रडत असताना, मूल जमिनीवर पडते आणि बेशुद्ध पडते. कोचिंगमध्ये बेशुद्ध पडल्याने मुलाला रुग्णालयात नेण्यात आले. या मुलावर सध्या उपचार सुरू आहेत.

या मुलाला बेदम मारहाण करणाऱ्या शिक्षकाचे छोटू असे नाव आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.