उमेश कोल्हे खून प्रकरण: एनजीओ चालवणारा मास्टरमाईंड, पोस्ट फॉरवर्ड करणारा डॉक्टर आणि पाच खुनी मजूर

Umesh Kolhe murder case: NGO-run mastermind, post-forward doctor and five murderous laborers

अमरावती : अमरावतीमध्ये उमेश प्रल्हाद कोल्हे यांची 21 जून रोजी रात्री 10 ते 10.30 च्या दरम्यान चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. सोशल मीडियावर नुपूर शर्माला सपोर्ट करणारी पोस्ट कारणीभूत असल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी मुख्य आरोपी इरफान खानसह सात आरोपींना अटक करण्यात आली होती. इरफान खान (वय 32) याला शनिवारी नागपुरात पोलिसांनी अटक केली. इरफान खान एक एनजीओ चालवतो.

इरफान खानने उमेशच्या हत्येचा कट रचला होता. इरफानने पाच मजुरांना पैशाचे आमिष दाखवले. त्याच्याकडे फंड कुठून येणार होता. हे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या चौकशीनंतर कळेल. या प्रकरणात आणखी काही कनेक्शन आहे का, याचा तपास एनआयए करीत आहे.

सोशल मीडियावरील पोस्ट उमेश कोल्हेने फॉरवर्ड केली आहे. डॉ. युसुफ खान बहादुर खान बिलाल हे पोस्ट फारवर्ड करण्याचे काम करत होते. यांनी या प्रकरणाला खतपाणी देण्याच कामं केले. इरफान खाननं उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचं कट कारस्थान रचलं.

ही आरोपींची नावे आहेत

मुद्दस्सीर अहमद उर्फ ​​सोनू राजा शेख इब्राहिम (वय 22), शाहरुख पठाण उर्फ ​​बादशाह हिदायत खान (वय 25), अब्दुल तौफिक उर्फ ​​नानू शेख तस्लीम (वय 24), शोहेब खान उर्फ ​​बुरिया साबीर खान (वय 22), अतिब रशीद आदिल रशीफ तिकडे होते. हे पाच जण मजूर आहेत.

युसूफ खानने आगीत तेल ओतले

डॉ.युसूफ खान हे पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत. उमेश कोल्हे हे मेडिकल स्टोअर चालवत होते. त्यामुळे त्यांच्यात घरगुती संबंध होते. उमेश कोल्हे यांनी दिलेली पोस्ट युसूफ खानने फॉरवर्ड केली होती.

त्यामुळे द्वेषाची ठिणगी पेटली. उमेशची हत्या केल्यानंतर पाचही मजूर पळून गेले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून तपास केला.

युसूफ खान आणि उमेश कोल्हे यांचे कौटुंबिक संबंध असल्याची माहिती महेश कोल्हे यांनी दिली. मृत उमेश कोल्हे हा आरोपी युसूफ खानच्या घरगुती कार्यक्रमात अनेकदा सहभागी झाला होता. उमेश कोल्हे यांच्या अंत्यसंस्काराला युसूफ खानही उपस्थित होता.