Hyundai Venue Price, EMI, Car Loan, Downpayment, Features & Specification | ज्या ग्राहकांना 10 लाखांच्या बजेटमध्ये चांगला लूक आणि आकर्षक वैशिष्ट्ये तसेच चांगले मायलेज असलेली SUV खरेदी करायची आहे त्यांच्यासाठी Hyundai Venue हा एक चांगला पर्याय आहे.
Hyundai Venue फेसलिफ्टची किंमत 7.53 लाख रुपयांपासून सुरू होते. सब कॉम्पॅक्ट 4 मीटर SUV व्हेन्यू 5 ट्रिम लेव्हलमध्ये आणि E, S, S+/S(O), SX आणि SX(O) सारख्या 16 व्हेरीअंट मध्ये ऑफर केली जाते.
या सर्व प्रकारांची किंमत 7.53 लाख ते 12.72 लाख रुपये आहे. नवीन Hyundai Venue पेट्रोल तसेच डिझेल इंजिन आणि मॅन्युअल तसेच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे आणि 23 kmpl पर्यंत मायलेज देते.
9.8 टक्के व्याजदर
Hyundai Venue E पेट्रोल हे सर्वात बजेट मॉडेल आहे ज्याची एक्स-शोरूम किंमत 7.53 लाख रुपये आहे. ऑन-रोड किंमत रु 8,49,778 आहे.
तुम्ही Hyundai Venue E पेट्रोल मॉडेलला 1 लाख रुपये (ऑन-रोड प्लस प्रोसेसिंग फी आणि पहिल्या महिन्याचे EMI) डाउन पेमेंटसह वित्तपुरवठा केल्यास, ग्राहकाला 9.8 टक्के व्याजदराने 7,49,778 रुपये कर्ज मिळेल.
ईएमआय कॅल्क्युलेटरनुसार पुढील 5 वर्षांसाठी, ग्राहकांना दरमहा 15,857 रुपये EMI भरावे लागेल. Hyundai Venue E पेट्रोल प्रकारासाठी फायनान्स केल्यास ग्राहकांना 2 लाखांपेक्षा जास्त व्याज द्यावे लागेल.
2.36 लाख जास्त व्याज
Hyundai Venue S पेट्रोल व्हेरियंटची किंमत 8.70 लाख रुपये आहे आणि ऑन-रोड किंमत 9,78,742 रुपये आहे. ग्राहक रु. 1 लाख (ऑन-रोड प्लस प्रोसेसिंग फी आणि पहिल्या महिन्याचे EMI) डाउनपेमेंट देऊन Hyundai Venue S प्रकारासाठी फायनान्स करू शकतात.
कार देखो ईएमआय कॅल्क्युलेटरनुसार, ग्राहकाला रु.8,78,742 चे कर्ज मिळेल. यानंतर, 9.8 टक्के व्याज दराने 5 वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 18,584 रुपयांचा हप्ता भरावा लागेल. Hyundai Venue पेट्रोल प्रकारासाठी फायनान्स केल्यानंतर ग्राहकांसाठी 2.36 लाखांचे व्याज लागणार आहे.