Gold Price Today : मजबूत होत असलेला डॉलर निर्देशांक आणि भारतीय चलनात सातत्याने होत असलेली घसरण यामुळे मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वरही सोन्याच्या किमतीत चढ-उतार होताना दिसत आहेत.
या आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी सोन्याच्या भावात कमालीची घसरण झाली. MCX वर सोन्याचा ऑक्टोबरचा करार या आठवड्यात सहा महिन्यांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केल्यानंतर 49,399 प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला.
एमसीएक्सवर सोन्याचा भाव 49,250 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरला होता, जो गेल्या सहा महिन्यांतील नीचांकी पातळीवर आहे.
घट सुरू राहू शकते
सोन्याची स्पॉट किंमत $1,639 प्रति औंस या इंट्राडे नीचांकी स्तरावर गेल्यानंतर $1,643 प्रति औंस या 2 वर्षांच्या नीचांकी पातळीवर बंद झाली.
कमोडिटी मार्केट तज्ज्ञांच्या मते सोन्याच्या किमतीतील घसरण दीर्घकाळ सुरू राहू शकते. कारण जागतिक मंदी, चलनवाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण यामुळे सोन्याच्या दरात तेजी दिसून येते.
किंमत किती कमी होऊ शकते
बाजारातील तज्ज्ञांच्या मते, मजबूत डॉलर आणि उच्च यूएस बॉन्ड उत्पन्नामुळे गुंतवणूकदारांची भावना कमी झाली आहे. डॉलर इंडेक्सने 20 वर्षांतील उच्चांक गाठला आहे.
सोन्याचे भाव दोन वर्षांच्या नीचांकी पातळीवर आले आहेत. अशा स्थितीत गुंतवणूकदारांना आणखी थोडा वेळ थांबण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.
देशांतर्गत बाजारात सोने 48,000 रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत पोहोचू शकते, असा त्यांचा विश्वास आहे.
फेब्रुवारीपासून घट
रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर फेब्रुवारी 2022 च्या अखेरीस भारतातील सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. फेब्रुवारीअखेरीस 24 कॅरेट सोन्याचा भाव सुमारे 55,000 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.
सध्या ते 50,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. भौगोलिक-राजकीय कारणांमुळे बाजारातील अस्थिरता असूनही अक्षय्य तृतीयेच्या वेळी एप्रिल-जून तिमाहीत भारतातील सोन्याची मागणी 43 टक्क्यांनी वाढली.
रुपयात मोठी घसरण
शुक्रवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ८१ रुपयांच्या जवळ पोहोचला आहे. गेल्या काही महिन्यांपासून रुपयाच्या मूल्यात सातत्याने घसरण होत आहे. याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.
शुक्रवारी 83 पैशांची घसरण झाली, जी गेल्या सात महिन्यांतील एकाच दिवसातील सर्वात मोठी घसरण मानली जाते. यापूर्वी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 19 पैशांनी घसरला होता आणि 80.98 च्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता.