नवी दिल्ली : 2015 च्या यूपीएससी परीक्षेत (UPSC exam) देशात पहिली येणारी टीना डाबी आता महाराष्ट्राची सुन झाली आहे.
IAS डाबी आणि IAS प्रदीप गवांडे विवाह बंधनात बंधलेले आहेत. जयपुरच्या एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये हे दोघे विवाहबंधनात आडकले.
यानंतर आता IAS डाबी आणि IAS प्रदीप गवांडे (IAS Pradip Gawande) यांच्या लग्नाचा एक फोटो समोर आला आहे.
ज्यात टीना आणि प्रदीप पांढऱ्या पोशाखामध्ये एक-दूसऱ्यांच्या समोर उभे आहेत. विशेष बाब म्हणजे त्यांच्यासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो आहे.
फोटोमध्ये प्रदीप आणि टीना (IAS officer Tina Dabi)हे गळ्यात हार घातलेले दिसत आहेत. तर लोक त्यांच्यावर फूलं टाकत आहेत. तर हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला जात असून नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत.
अनेकांचे लक्ष तिथे असणाऱ्या बाबासाहेबांच्या फोटोकडे जात आहे. त्यावर एकाने लिहिले की, की बाबासाहेबांचा फोटो पाहून आनंद झाला.
very happy marriage wishes
@dabi_tina Ji pic.twitter.com/3WYIEqscUC— VINOD JAKHAR (@VinodJakharIN) April 22, 2022
लग्नासंदर्भात स्वत: माहिती दिली
टीना दाबीला यूपीएससीच्या पहिल्या दलित टॉपरचा टॅगही मिळाला आहे. 2015 मध्ये UPSC मध्ये टॉप आल्यापासून ती जातीवरून चांगलीच चर्चेत आली होती.
त्यानंतर ती अनेक ठिकाणी दलितांच्या बाजूने बोलताना दिसत होती. तसेच टीनाने एका मुलाखतीत असेही म्हटले होते की, प्रदीप तिच्यासारखाच एससी समुदायातून येतो.
Congratulations to Tina Dabi and Pradeep Gawande on their marriage. Jai Bhim Namo Buddhay! pic.twitter.com/weIWRAIaPU
— Harsh (@_ambedkarite) April 22, 2022
दरम्यान याच्याआधीच तिने आपल्या लग्नासंदर्भात स्वत: माहिती दिली होती. तसेच याबद्दलची माहिती इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. विशेष म्हणजे टीनानं प्रदीप यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे.
‘तू दिलेलं हास्य परिधान करतेय’, अशा कॅप्शनसह टीनानं प्रदीप यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. 2016 च्या बॅचची यूपीएससी टॉपर टीना डाबीनं 2018 मध्ये अतहर आमीरसोबत निकाह केला. मात्र दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. त्यानंतर टीना आता दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे.