Swaroopanand Saraswati : हिंदूंचे महान धर्मगुरू शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांचे निधन

Great Hindu Guru Shankaracharya Swaroopananda Saraswati passed away

Swaroopanand Saraswati : हिंदू धर्माचे महान धर्मगुरू शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती (Swaroopanand Saraswati) यांचे निधन झाले आहे. शंकराचार्यांनी वयाच्या 99 व्या वर्षी नरसिंगपूर येथे अखेरचा श्वास घेतला.

जगद्गुरू शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती हे दोन मठांचे (द्वारका आणि ज्योतिर्मठ) शंकराचार्य होते. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील सिवानी जिल्ह्यातील दिघोरी गावात झाला आणि वयाच्या 9 व्या वर्षी धार्मिक कार्यासाठी त्यांनी घर सोडले.

आज दुपारी 3.30 वाजता परमहंसी गंगा आश्रम, जोतेश्वर जिल्हा, नरसिंगपूर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शंकराचार्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतल्याबद्दल तुरुंगवासही भोगला आहे.

देशात अल्पसंख्याक समाजाच्या विरोधात वातावरण निर्माण केले जात आहे; शरद पवारांचा भाजपावर हल्लाबोल

राम मंदिराच्या उभारणीसाठी त्यांनी प्रदीर्घ कायदेशीर लढाही लढला. काही दिवसांपूर्वी स्वामीजींचा 99 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.

स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान

वयाच्या ९व्या वर्षी जगद्गुरू शंकराचार्य श्री स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी घर सोडले आणि तीर्थयात्रा सुरू केली. याच दरम्यान त्यांनी काशीला पोहोचून ब्रह्मलीन श्री स्वामी कर्पात्री महाराज यांच्याकडून वेद-वेदांग आणि शास्त्र शिकले. हा तो काळ होता, जेव्हा देश इंग्रजांविरुद्ध लढत होता.

देशात आंदोलने झाली, 1942 मध्ये गांधींनी भारत छोडोचा नारा दिला तेव्हा स्वामींनीही स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. त्यावेळी ते 19 वर्षांचे होते.

या युगात ते ‘क्रांतिकारक साधू’ म्हणून ओळखले जात होते. यादरम्यान त्यांनी नऊ महिने वाराणसी तुरुंगात आणि सहा महिने मध्य प्रदेशच्या तुरुंगात काढले.

हे देखील वाचा