क्राईम न्यूज : आदिवासी समाजातील महिलांवरील अत्याचार थांबण्याचे नाव घेत नाही. झारखंडमधील साहिबगंजमध्ये आदिवासी महिला रुबिकाच्या हत्येचे प्रकरण अद्याप चर्चेत असताना आणखी एका आदिवासी महिलेवर बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. जिल्ह्यातील मिर्झाचौकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंद्रो मार्केटमध्ये हा प्रकार समोर आला आहे.
येथे आरोपीने आदिवासी महिलेवर बलात्कार केला आहे. या घटनेबाबत पीडित आदिवासी महिलेने मिर्झाचौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींना अटक करून कारागृहात रवानगी केली. पोलिसांनी महिलेचा जबाब नोंदवून वैद्यकीय तपासणीही केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेने तिचा मोबाईल बनवून घेण्यासाठी मंद्रो बाजार येथील सद्दाम मोबाईल सेंटरला काही दिवसांपूर्वी गेली होती.
UP Crime News : प्रियकर इरफानने केला अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, विद्यार्थिनीची आत्महत्या
जेव्हा पीडित मुलगी मोबाईल घेण्यासाठी दुकानात गेली होती. तिला एकटी असल्याचे पाहून आरोपीने तिला मोबाईल देण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्याचवेळी आरोपीने पीडितेला याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
पीडितेने या घटनेची माहिती तिच्या कुटुंबीयांना दिली, त्यानंतर त्यांनी पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली.
दोन दिवसांत आदिवासी महिलेसोबतची ही दुसरी अमानवी घटना आहे. विशेष म्हणजे याआधीही रुबिका पहारिया (आदिवासी) हत्याकांड प्रकरण चव्हाट्यावर आले होते. हत्येनंतर रुबिकाच्या मृतदेहाचे अनेक तुकडे करून आरोपींनी जंगलात फेकून दिले होते.
हे देखील वाचा
- Crime News : गर्भवती पत्नीपासून हवा होता घटस्फोट, पतीने दिले एचआयव्हीचे इंजेक्शन
- गांधी जुन्या तर मोदी नव्या भारताचे राष्ट्रपिता : अमृता फडणवीसांचे विधान
- Aurangabad Crime : दहावीच्या विद्यार्थीनीवर धाब्यावर नेऊन बलात्कार