Crime News : गर्भवती पत्नीपासून हवा होता घटस्फोट, पतीने दिले एचआयव्हीचे इंजेक्शन

Crime News: Divorce from pregnant wife, husband gave HIV injection

Crime News: आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीपासून घटस्फोट घेण्याच्या अट्टाहासापाई एका व्यक्तीने इतके भयंकर कृत्य केले, ते ऐकून तुम्हाला संताप येईल.

विवाहित युवकाचे पत्नीसोबत दुसऱ्या एका महिलेशी अवैध संबंध होते. पत्नी गरोदर असतानाही तो अत्यंत अनैसर्गिक संबंध बनवत होता. या घटनेमुळे परस्पर संबंध ताणले गेले होते.

त्यामुळे पत्नीपासून सुटका करून घ्यावी म्हणून घटस्फोट घेण्यासाठी तरुणाने मोठे पाऊल उचलले. पतीने पत्नीला संपविण्यासाठी एचआयव्ही पॉझिटिव्ह रक्ताचे इंजेक्शन दिले.

एचआयव्हीचे इंजेक्शन बोगस डॉक्टरने दिले 

आरोपी एम. चरण याला पोलिसांनी अटक केली आहे. खरंतर नवऱ्याला बायकोपासून सुटका हवी होती. आरोपीचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध होते.

यासाठी त्याला पत्नीला घटस्फोट घ्यायचा होता. मात्र घटस्फोटाची मागणी करण्यासाठी पतीकडे कोणतेही वैध कारण नव्हते. यामुळे वासनांध आरोपी पतीने हे पाऊल उचलले.

पत्नीला खोटे आश्वासन दिले

हे इंजेक्शन का दिले जात आहे, अशी विचारणा महिलेने पतीला केली. त्यामुळे पतीने पत्नीला सांगितले की, याला घाबरण्याची गरज नाही. हे शक्तिवर्धक इंजेक्शन आहे.

या इंजेक्शनमुळे गरोदरपणात आरोग्य उत्तम राहते. पत्नीची तब्येत चांगली राहावी यासाठी हे इंजेक्शन दिल्याचे आश्वासन देण्यात आले.

मोठा खुलासा नंतर झाला

पत्नीने सांगितले की, रुग्णालयात तपासणी केल्यानंतर तिला एचआयव्ही असल्याचे आढळून आले. तिचा पती हुंड्यासाठी छळ करत असे आणि मुलगा होण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप महिलेने केला आहे.

पीडित महिलेचा आरोप आहे की, तिचा नवरा दुसऱ्या महिलेसाठी हे सर्व करतो. पती तिचा छळ करत होता आणि घटस्फोटासाठी जबरदस्ती करत होता, असा पत्नीचा आरोप आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलीस अधिक तपास करणार आहेत.