धक्कादायक : 3 मुलांच्या आईचा 19 वर्षीय भाच्यावर जडला जीव; पतीला घटस्फोट न देता गेली पळून

Crime News

नवी दिल्ली : राजस्थानमधील चुरू येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे 3 मुलांची आई तिच्या 19 वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडते. आपल्या भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली मामी तिच्या 3 मुलांना सोडून प्रियकर भाच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.

दोघेही आता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. त्यांना अजूनही एकत्र राहायचे आहे. यासाठी त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून सुरक्षेची विनंती केली. महिलेच्या आई-वडिलांना आणि सासरच्या मंडळींना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी दोघांनाही जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या जोडप्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे गेल्या चार वर्षांपासून प्रेम होते. वर्षभरापूर्वी महिलेने ही घटना घरच्यांना सांगितल्यावर पती आणि घरातील सदस्यांनी तिला मारहाण केली.

पुढे दोघांचे प्रेमप्रकरण दुर्लक्षित राहिले. त्यानंतर 19 डिसेंबर रोजी महिलेने सासरच्या मंडळींना न सांगता प्रियकर भाच्याकडे रतनगड येथे त्याचे घर गाठले. त्यानंतर दोघांनी सोमवारी रतनगड न्यायालयातून नातेसंबंधाचे प्रमाणपत्र तयार केले.

महिलेचा 11 वर्षांपूर्वी विवाह झाला होता

तिने सांगितले की, संबंधित महिला चुरू येथील रहिवासी आहे. तिचे लग्न 11 वर्षांपूर्वी सीकर येथील तरुणाशी झाले होते. साडेचार वर्षांपूर्वी त्यांचा भाचा सीकर येथील मामाकडे आला होता. तो रतनगडचा रहिवासी आहे.

दरम्यान, दोघांमधील नाजूक नात्याचे रुपांतर प्रेमात झाले. दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागले. मात्र ही बाब नातेवाईकांना समजताच एकच खळबळ उडाली. महिलेने सांगितले की, पतीने तिला मारहाण केली आणि सदरील भाच्याशी कोणताही संबंध ठेवू नको, असा दबाव टाकला जात असल्याचे सांगितले.

लाडक्या भाच्याने  लाडक्या मामीला हॉटेलमध्ये ठेवले

मामी आणि भाच्याचे प्रेमप्रकरण उघडकीस येताच त्यांच्या कुटुंबीयांनी या प्रेमी युगुलावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. पण आपल्या भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली मामी 19 डिसेंबर रोजी पती आणि मुलांना सोडून पळून गेली.

ती रतनगडावर प्रियकर भाच्याकडे राहायला आली. तिथे तिला भाच्याने तिला एका हॉटेलमध्ये ठेवले. तिथे राहण्यासाठी त्यांनी लिव्ह इन प्रमाणपत्र दाखवले.