Crime News : शेतात ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला, डोक्यात दगड घालुन हत्या केल्याचा संशय

Crime News

अमरावती : शेतात ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अमरावती जिल्ह्यातील धारणीपासून 20 किमी अंतरावर असलेल्या बिजुधावडी आणि हातिडा गावांदरम्यानच्या शेतात ही घटना घडली.

धारणी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पाहून अज्ञात व्यक्तीने महिलेच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचा आरोप आहे. महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. या हत्येमागचे कारण काय हे अद्याप समजू शकले नाही. त्यामुळे हत्येमागचा हेतूही अद्याप अस्पष्ट आहे.

काय आहे प्रकरण?

अमरावती जिल्ह्यातील धारणीपासून 20 किमी अंतरावर असलेल्या बिजुधावडी आणि हातिडा गावांदरम्यान एका 35 वर्षीय महिलेचा मृतदेह शेतात आढळून आला. धारणी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही.

डोक्यात दगड घातल्याचा संशय

महिलेच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी गोहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे व पोलीस पथक तपास करत आहेत.

चाणक्य नीति : मुलांना सुसंस्कृत आणि यशस्वी बनवायचे आहे, तर पालकांनी चाणक्य नीतीच्या या गोष्टी लक्षात ठेवाव्यात

महिलेची ओळख पटवण्यासाठी आजूबाजूच्या गावातील पोलीस गस्ती पथकांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून श्वान पथक आणि फॉरेन्सिक लॅबच्या पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. याप्रकरणी धारणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

RECENT POSTS