Crime News : राजधानी नवी दिल्लीतील ‘श्रद्धा वॉकर हत्याकांड’ अजूनही लोक विसरलेले नाहीत, त्या दरम्यान आता झारखंडमधील साहिबगंजमधून असेच एक हृदयद्रावक प्रकरण समोर आले आहे.
जिल्ह्यातील बोरीओ येथे 22 वर्षीय आदिवासी मुलीचे कटरने 12 तुकडे करून फेकण्यात आले. आरोपी दुसरा कोणी नसून तिचा पती दिलदार अन्सारी आहे, निकटवर्तीयानी सांगितले की दोघेही जवळपास दोन वर्षे एकत्र राहत होते.
बोरीओ पोलीस ठाण्याने सांगितले की, शनिवारी सायंकाळी उशिरा संथाली मोमीन टोला येथील कच्चा घरातून महिलेचा मृतदेह 12 हून अधिक तुकड्यांमध्ये सापडला. तिच्या मानेसह शरीराच्या वरच्या भागाचे अनेक भाग अद्याप सापडलेले नाहीत. ज्यांच्या शोधात टीम गुंतली आहे.
एसपी अनुरंजन किस्पोट्टा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रूबिका पहारिया (22 वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे, ती बोरियो भागातील गोंडा पहार येथील रहिवासी आहे. पती दिलदार अन्सारी (25 वर्षे) याने तिची हत्या केली होती.
मृत युवती ही आदिम पहारिया जमातीची होती, तर आरोपी एका विशिष्ट समाजातील आहे. गेल्या दोन वर्षांपासून दोघेही एकाच घरात राहत होते. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
दिलदारची दुसरी पत्नी रुबिका
एसपीने पुढे सांगितले की, रुबिका पहाडिया ही दिलदार अन्सारीची दुसरी पत्नी होती. गेल्या 2 वर्षांहून अधिक काळ ते एकमेकांना ओळखत होते.
दरम्यान रुबिका गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होती. बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी स्थानिक पोलिस ठाण्यात धाव घेतली होती.
कुत्रे पायाचे लचके तोडत होते
वास्तविक, शनिवारी सायंकाळी मोमीन टोला येथील लोकांना अंगणवाडी इमारतीच्या मागे कुत्र्यांचा कळप दिसला, जो मांसाचे लचके तोडत होता. काही जणांनी जवळ जावून पाहिले तेव्हा हे मांसाचे तुकडे (पाय) मानवी शरीराचे असल्याचे आढळून आले.
गावकऱ्यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली. तातडीने तपास करण्यासाठी घटनास्थळी पोलीस पोहोचले. पोलिसांनी बंद घरात पोहचल्यावर तिथे त्यांना एका महिलेचा मृतदेह पडलेला आढळून आला.
मृतदेह कटरने कापला
महिलेच्या मृतदेहाचे 12 हून अधिक तुकडे सापडले असून, हत्येनंतर मृतदेह इलेक्ट्रिक कटरसारख्या धारदार हत्याराने कापण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.
सध्या मृताची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा पतीला अटक केली. आता या संपूर्ण प्रकरणाबाबत त्याच्याकडे चौकशी केली जात आहे.
भाजपचा हेमंत सोरेन सरकारवर हल्लाबोल
एका आदिवासी महिलेच्या हत्येमुळे झारखंडचे राजकारण तापले आहे. भाजपने हेमंत सोरेन सरकारला जबाबदार धरले आहे.
पक्षाचे प्रवक्ते प्रतुल शाहदेव यांनी म्हटले आहे की, दिलदार अन्सारी याने या निष्पाप आदिवासी मुलीला जाळ्यात अडकवून नुकतेच लग्न केले होते.
हेमंत सरकार यांच्या कार्यकाळात मुलींवरील अत्याचारात सातत्याने वाढ झाली आहे. अल्पसंख्याक समाजातील काही लोक सतत हिंदू मुलींना लक्ष्य करत आहेत.
मात्र सरकार कोणतेही पाऊल उचलत नाही. सरकारने ठोस पावले उचलली नाहीत तर रस्त्यावर उतरून सरकारला चोख जाब विचारू, तेव्हा सरकारने कठोर कारवाई करून आदिवासी मृत तरुणीला न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.
हे देखील वाचा
- कीर्तनकार सुनीता आंधळे यांची सुषमा अंधारे यांच्यावर सडकून टीका
- CIBIL स्कोर खराब झाल्यामुळे कर्ज मिळण्यात अडचण, आता काय करायचे ते जाणून घ्या
- UPI ट्रान्सक्शन अयशस्वी झाल्यानंतरही पैसे कापले, तक्रार कुठे करायची? पूर्ण माहिती जाणून घ्या