मुंबई : नेरूळच्या बालाजी टेकडी परिसरात मित्रासोबत फिरायला गेलेल्या 16 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर एका ‘कथित’ पोलीस कर्मचाऱ्याने तिच्यासोबत असलेल्या तरुणाला धमकावल्याची आणि तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी नेरुळ पोलिसांनी अज्ञात पोलिसांविरुद्ध पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. या घटनेतील पीडित 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही विज्ञान शाखेची विद्यार्थिनी असून ती नेरुळ रेल्वे स्थानकाजवळील एका खासगी क्लासमध्ये शिकण्यासाठी येते.
आजपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन; सीमावादासह ‘या’ मुद्द्यांवरून वादळी चर्चा होण्याची शक्यता
गेल्या बुधवारी रात्री 8.30 वाजता क्लास सुटल्यानंतर पीडित मुलगी नेरूळ सेक्टर-22 येथील बालाजी मंदिराजवळील टेकडीवर तिच्या मित्रासोबत फिरायला गेली होती.
तिथे पीडिता तिच्या मित्रासोबत गेली होती, तर तिच्या सोबत आलेले एक मित्र आणि इतर तीन मैत्रिणी चौघेही त्यांची वाट पाहत खाली उभे होते.
दरम्यान, टेकडीवर आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने पीडित तरुणीचा आणि तिच्या मित्राचा पाठलाग केला आणि तरुणीसोबत असलेल्या मित्राला घटनास्थळावरून मारहाण करून हुसकावून लावले.
त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने निर्जन ठिकाणी नेऊन पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केला, असे पीडित मुलीने तक्रारीत म्हटले आहे.
या घटनेनंतर पीडित मुलीने घरी पोहोचून तिच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. मुलीवर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांनी नेरुळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानुसार पोलिसांनी अज्ञात पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. या घटनेतील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.
तसेच, पीडित तरुणी आणि तिच्या मित्राने दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपीचे रेखाचित्र तयार करून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे. मात्र अद्याप पोलिसांच्या हाती काहीही लागलेले नाही.
हे देखील वाचा
- UPI ट्रान्सक्शन अयशस्वी झाल्यानंतरही पैसे कापले, तक्रार कुठे करायची? पूर्ण माहिती जाणून घ्या
- Crime News : नवरा कामानिमित्त बाहेर गावी, बायकोचे तरुणाशी प्रेमसंबंध, सासूला ठरू लागली अडथळा आणि घडला भयानक प्रकार
- MVA निषेध: माविआ 17 डिसेंबरच्या मोर्चावर ठाम, राज्यातील जनतेला सहभागी होण्याचे आवाहन